संवेदना फाउंडेशनतर्फे कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी गुणगौरव व वृक्षारोपण सोहळा संपन्न.

  • प्रतिनीधी : मंडणगड : प्रमोद तरळ :- संवेदना फाउंडेश न संस्थेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महा विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव आणि वृक्षारोपण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयातर्फे संवेदना फाऊंडेशन संस्थेच्या वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवल्या बद्दल या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
  • या सोहळ्यात दिव्यांग क्रिकेटर कु.सुधीर भोसले आणि धावण्याच्या १०० मीटर स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कुमारी समृध्दी रामचंद्र सकपाळ, लाटव ण हायस्कूलची विद्यार्थिनी हिचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेतर्फे इतरही उपक्रम घेण्यात आले होते.
  • सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद मा.सहाय्यक पोलीस आयुक्त (AC P) श्री.रमेश घडवले यांनी भूषवले.
  • कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्याल याच्या प्राचार्या सौ. प्रतिभा पाटील आणि संवेदना फाउंडे शनचे अध्यक्ष श्री.विनोद सदानंद चाळके प्रामुख्याने उप स्थित होते.
  • याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे हितचिंतक तथा दापोली पंचायत समिती सदस्य श्री.राजेंद्र फणसे, शौर्य फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रविणजी लाड, सार्वजनिक बांध काम उपविभागाचे उपाभियंता श्री.राम जाधव आणि जि. प. सदस्य श्री. प्रताप घोसाळकर उपस्थित होते.
  • तसेच पंचायत समितीचे उपसभापती श्री.दिपक मालुसरे, ॲड.यश घोसाळकर, भारतीय सैनिक श्री.सचिन गायकवा ड, भारत सरकारच्या खेळ व क्रीडा मंत्रालयाचे प्रतिनिधी श्री.विशाल काकडे आणि नाट्य दिग्दर्शक श्री.शैलेश फण सगावकर व श्री रजनीकांत धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते श्री. सूर्यकांत घाडगे श्री.संजय शिंदे यांनीही उपस्थित राहून वि द्यार्थ्यांचे कौतुक केले.
  • सोहळ्यात मंडणगड तालुक्यातील कार्यक्रमाला डॉ.बाबा साहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय,‌ कर्मवीर दादा इदा ते कनिष्ठ महाविद्यालय कुंबळे, एस.पी.कॉलेज मंडणगड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल,लालबहाधुर शास्त्री हायस्कूल दहागाव,लाटवण पांचक्रोशी मराठी माध्यमिक विद्यामंदिर लाटवण,पनदेरी – पेवे पंचक्रोशी हायस्कूल, रा जू गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल मंडणगड,शहीद तुकाराम भोईटे हायस्कूल कुंबळे या विद्यालय आणि कनिष्ठ महावि द्यालयातील गुणवंत विध्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.
  • यावेळी विशेष सन्मान म्हणून प्राचार्य सौ.प्रतिभा पाटील, मा.मुख्यद्यापक श्री बाबासाहेब हुलगे,उप मुख्याध्यापक श्री.अर्जुन हुल्लोळी व समाजसेवक श्री.लक्ष्मण रा.कदम यांचा करण्यात आला.
  • सदर सोहळा यशस्वी करण्यासाठी संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.विनोद सदानंद चाळके, श्री.अजय शिगवण, श्री.समीर म्हाबदी, श्री.नंदू निकम, श्री.प्रसाद पांचाळ, श्री. विकास चाळके, श्री.ओंकार चाळके, श्री.दिपक गुप्ता तसे च महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.अर्जुन हुल्लोळी, शिक्ष क व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
  • पर्यावरण रक्षण आणि सामाजिक कार्यात तरुण पिढीचा सहभाग वाढवण्यासाठी फाउंडेशन नेहमीच कटिबद्ध राही ल असा विश्वास अध्यक्ष श्री. विनोद सदानंद चाळके यांनी व्यक्त केला. या सोहळ्याला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles