श्रीराम हायस्कूल पाचपिंपळाचा तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात जिल्हास्तरावर निवड….!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-स्थानिक गट शिक्षण कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालु कास्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२६ स्पर्धेत श्रीराम हायस्कूल, पाचपिंपळा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृ ष्ट सादरीकरणाच्या जोरावर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.
  • या घवघवीत यशामुळे विद्यालयाच्या या विजेत्या संघाची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा नाट्य महोत्सव पार पडला.
  • या स्पर्धेत श्रीराम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि अभिनय यांचा सुरेख संगम साधत उपस्थितांची मने जिंकली.
  • या विजयी टीमचे मार्गदर्शक शिक्षक श्री.पाटील एस.एस. यांचे परंडा गट शिक्षण कार्यालयाचे नूतन गटशिक्षणाधि कारी मा.श्री.इंगळे साहेब आणि विस्तार अधिकारी श्री.हा के साहेब यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले.
  • याप्रसंगी परीक्षक व मान्यवर म्हणून श्री.वाघमारे सर, काळे सर, व्ही.एम.खैरे, आर.व्ही.देशमुख, श्री.लोदवाल सर, डोके साहेब आणि जगताप मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
  • विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. बाळासा हेब (भाऊ) पडघन, मुख्याध्यापक श्री.देशमुख आय.डी. सर, तसेच पाचपिंपळा येथील सर्व ग्रामस्थ, पालक आणि विविध पदाधिकाऱ्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेतील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
  • या यशामुळे पाचपिंपळा परिसरातून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles