
कुंभेफळ ग्रामपंचायत सदस्यांना पाच वर्षांचा प्रलंबित सदस्य भत्ता अखेर वाटप!उपसरपंच फारुख शेख यांच्या पाठपुराव्याला यश; गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर धनादेश सुपूर्द.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कुंभेफळ:येथील कुं भेफळ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांना गेल्या पाच वर्षांपासून अद्यापपर्यंत स दस्य भत्ता वाटप करण्यात आलेला नव्हता.
- या गंभीर बाबीची दखल घेत कुंभेफळचे उपसरपंच फारु ख उस्मान शेख यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे सातत्या ने केलेल्या प्रभावी पाठपुराव्यामुळे अखेर सर्व सदस्यांना त्यांच्या हक्काचा पाच वर्षांचा प्रलंबित सदस्य भत्ता धनादे शाद्वारे (चेक) वाटप करण्यात आला आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार, कुंभेफळ ग्रामपंचायतीच्या सद स्यांचा भत्ता प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होता.
- हा हक्काचा भत्ता सदस्यांना मिळावा म्हणून उपसरपंच फारुख शेख यांनी गटविकास अधिकारी गायकवाड यां च्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात जोरदार पाठपुरावा केला होता.
- या पाठपुराव्याची दखल घेत गटविकास अधिकारी गायक वाड व विस्तार अधिकारी कोठे साहेब यांनी तत्कालीन ग्रा मविकास अधिकारी खटकाळे व विद्यमान ग्रामविकास अ धिकारी बी एन कांबळे यांना या प्रकरणी तात्काळ सदस्य भत्ता वाटप करण्याचे कडक आदेश जारी केले होते.
- वरिष्ठांच्या आदेशानंतर विद्यमान ग्रामविकास अधिकारी बी.एन.कांबळे यांनी तत्परता दाखवत अवघ्या आठ दिव सांच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण केली आणि कुंभेफळ ग्राम पंचायत कार्यालयात सर्व सदस्यांना पाच वर्षांच्या भत्त्याचे धनादेश प्रत्यक्ष वाटप केले.
- यांची उपस्थिती:धनादेश वाटपाच्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी सरपंच बापू लिंबाजी कोठुळे, उपसरपंच फारुख उस्मान शेख, ग्रामपंचायत सदस्य रामा रावसाहेब आवाळे, सदस्या पद्मिनी बजरंग यादव, सदस्या अंजुम फकीर पठा ण, सदस्या कौशल्या नरसू नायकुडे प्रामुख्याने उपस्थित होते.

- तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक फकीर पठाण,नरसू ना यकोडे . दशरथ राऊत, दस्तगीर शेख, बळीराम, ज्ञानेश्वर माऊली, रामदास मेंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
- गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लावल्याबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी उपसरपंच फारुख शेख व प्र शासनाचे विशेष आभार मानले आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






