
ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळाचे अध्यक्ष श्री गणेश पवार यांचा वाढदिवस वृक्षारोपण करुन साजरा.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- पर्यावरण संरक्षण का ळाची गरज आहे.एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करु या वृक्ष मोठा होई पर्यंत त्या वृक्षाचे संगोपन करुया तरच आपल जिवन अमुल्य प्रदुषण मुक्त होईल व शुध्द हवा मि ळु शकेल. आक्सीजन मोठ्या प्रमाणात मिळेल.
- वृक्षारोपण वृक्षसंवर्धन “एक वृक्ष आरोग्य स्वस्थ” चला सं कल्प करुया एक वृक्ष लावुन जन्मदिवस साजरा करुया पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करुया.

- ही संकल्पना घेऊन ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंड ळ, नालासोपारा उपरोक्त मंडळाचे अध्यक्ष गणेश पवार यां नी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
- नुकताच विरार येथील फुलपाडा धरण परिसरात श्री संत सेवा भजन सामाजिक संस्था महासंघ ( रजि.) यांच्या व तीने रविवार,दि. १२ जुलै २०२६ रोजी “वृक्षारोपण सोह ळा – एक हरित संकल्प” हा उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
- या उपक्रमात ओम गुरुदेव रेल्वे प्रवासी भजन मंडळ,नाला सोपारा (मोरेगाव) यांच्या वतीने ५१ वृक्षांचे रोपण करण्या त आले.
- याच प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या आगामी ( १४ जुलै रोजी झालेल्या) वाढदिवसानिमित्त वृ क्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.
- वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाजासाठी विधायक कार्य करण्याचा आदर्श त्यांनी स र्वांसमोर ठेवला आहे.
- यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, सचिव विनोद च व्हाण, खजिनदार प्रेमनाथ गुरव, विशेष अधिकारी जयरा म पवार, तसेच सुनील कदम,सतीश ढगाले,विठ्ठल मयेक र, नितीन रसाळ, शिवाजी भानत, प्रभाकर माऊली, अंकु श सावंत,श्रीरंग कोळेकर, भेकरे माऊली,रुपेश हातणकर, राम माऊली, जीवन मोरे माऊली, परभ माऊली, वैभव क दम,सुनील मोरे, केदार माऊली, चंद्रकांत गुरव आदी मान्य वर उपस्थित होते.
- या सोहळ्यास संस्थेच्या संलग्न विविध भजन मंडळांतील सुमारे ३०० सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वां च्या सहकार्यामुळे वृक्षारोपणाचा हा उपक्रम अत्यंत यश स्वी व प्रेरणादायी ठरला.
- यावेळी बोलताना गणेश पवार यांनी “पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
- प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केल्यास भावी पिढ्यांना स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण लाभेल,”असे आवाहन केले.संदर उपक्रमाचे विविध स्तरा तून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






