विवाहातील सामाजिक बांधिलकीचा आदर्श; नवदांपत्याकडून वस्तीगृहातील गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

  • प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- सामाजिक बांधिलकी जपत विवाहासारख्या मंगल प्रसंगाला सेवाकार्याची जोड देत क मलेश भाऊसाहेब गांगुर्डे व सौ.गायत्री गांगुर्डे या नवदांप त्याने एक प्रेरणादायी उपक्रम राबविला.
  • त्यांच्या विवाहानिमित्त जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी सं स्था, प्रतापपूर यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आर्थि कदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात राहणाऱ्या मुलांना शालेय साहित्य, पाठ्यपुस्तके, दप्तर व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
  • विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे कर णाऱ्या या उपक्रमामुळे साक्री तालुक्यात एक सकारात्मक संदेश गेला असून, अशा प्रकारचा आगळावेगळा सामाजि क उपक्रम प्रथमच राबविण्यात आल्याची भावना उपस्थि तांनी व्यक्त केली.
  • नवदांपत्याने आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरु वात समाजसेवेच्या कार्यातून करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
  • जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेत अनेक वर्षांपासून अनाथ, निराधार व गरीब कुटुंबातील विद्यार्थी निवासी स्व रूपात राहून शिक्षण घेत आहेत.
  • या मुलांच्या शिक्षण, निवास व संगोपनासाठी संस्था सात त्याने कार्यरत असून, नवदांपत्याने या विद्यार्थ्यांच्या शैक्ष णिक गरजा लक्षात घेऊन दिलेली मदत अत्यंत मोलाची ठरली आहे.
  • यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक शुभकार्याला सामाजिक उत्तरदायित्वाची जोड मि ळाल्यास अनेक गरजूंच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो.
  • विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर समाजाप्रती आ पली बांधिलकी व्यक्त करण्याचाही एक सुंदर क्षण आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
  • याप्रसंगी जय भद्रा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.जितेंद्र गांगुर्डे, प्रतापूर गावाचे माजी सरपंच श्री.धनरा ज गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते श्री.भूषण गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष किसान सेल, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.हर्षल ठाकरे, श्री.चंद्रकांत गांगुर्डे, श्री.सागर गांगुर्डे, श्री.सचिन गांगुर्डे, श्री.चेतन गांगुर्डे तसेच प्रतापूर गावातील तरुण, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • उपस्थितांनी नवदांपत्याचा सत्कार करून त्यांच्या या अ भिनव सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
  • “आनंदाचा खरा उत्सव तोच, जो समाजातील गरजूंच्या चे हऱ्यावर हास्य फुलवतो,” हा संदेश देणारा हा उपक्रम सा क्री तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात इत र नवदांपत्यांनीही अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles