
कुंभेफळ येतील ग्रामस्थांची परंडा आगार प्रमुखांकडे परंडा ते बिड परंडा ते अंबेजोगाई नव्या बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी.
- प्रतिनिधी : फारूक शेख :-मौजे कुंभेफळ व परिसराती ल गावांमधील प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय दूर करण्या साठी परंडा ते बीड आणि परंडा ते आंबेजोगाई अशा दोन नवीन बस फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी कुं भेफळ येथील ग्रामस्थांनी परंडा आगार प्रमुखांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
- या निवेदनाच्या प्रती आमदार राणाजगतसिंह पाटील आ णि धाराशिवच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना (DTO ) माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत.

- ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभेफळ आणि त्यापुढील गावातील नागरिकांना लांब पल्ल्याच्या गाड्या उपलब्ध नसल्यामुळे बीड आणि लातूर या जिल्ह्यां च्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा साम ना करावा लागत आहे.
- सध्या या मार्गावर इतर कोणत्याही आगाराची बस सेवा उपलब्ध नाही.
- ग्रामस्थांनी निवेदनात खालील दोन मार्गांवर बस सुरू कर ण्याची मागणी केली आहे: १) परंडा ते कुंभेफळ (आंतर गाव-भूम मार्गे बीड): सकाळी ९.०० वाजता.
- २) परंडा ते कुंभेफळ (आंतरगाव-भूम-वाशी-कळंब मार्गे आंबेजोगाई): दुपारी ३.०० (१५.००) वाजता.
- या दोन्ही फेऱ्या सुरू केल्यास कुंभेफळ आणि परिसराती ल अनेक गावांच्या नागरिकांची व प्रवाशांची मोठी सोय होईल.
- या मार्गावर प्रवाशांची संख्या चांगली असल्याने दोन्ही फे ऱ्यांमुळे प्रवाशांची गैरसोय तर दूर होईलच, शिवाय परंडा आगाराच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
- या निवेदनावर अब्दुल पटेल, शाबिर शेख, रामा आवळे, न रसु नायकुडे, फारुख शेख, मोतीराम भराडे, गवश पठाण, विट्ठल तिपाले, सुदाम कापसे, सूर्यकांत कोरे, नवनाथ गा वडे, रामहारी गायकड, ईत्यादिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






