परंडा येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात बैठक; २८ जुलैच्या धाराशिव मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी होणार.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :- अनुसूचित जाती (SC) समू हाच्या आरक्षण उपवर्गीकरण (अ, ब, क, ड) निर्णयाविरो धात येत्या २८जुलै २०२६ रोजी धाराशिव येथे भव्य मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
  • या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज, २१ जुलै रोजी परंडा येथी ल ऐतिहासिक धम्मराजिका महाविहार येथे तालुक्यातील अनुसूचित जाती समूहाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
  • या बैठकीत परंडा तालुक्यातून हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला.या प्रसंगी विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व प्रमुख नेते उपस्थित होते.
  • यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे, भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाविहार समितीचे अध्यक्ष राजें द्रकुमार निकाळजे, राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे, नगरसेवक रत्नकांत शिंदे, वं चित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते तानाजी बनसोडे आ णि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
  • आरक्षण उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समूहाच्या एकतेत फूट पडण्याची भीती व्यक्त करत, हा निर्णय रद्द करण्यासाठी धाराशिव येथील मोर्चात ताकदीने उतरण्या चे आवाहन नेत्यांनी केले.
  • या बैठकीला रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीर सुरवसे, रिपाई ता लुकाध्यक्ष दादा सरवदे, सोशल मीडिया आयटी सेलचे धा राशिव जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, संजीवन भोसले, ज यराम साळवे, भास्कर ओव्हाळ, बापू हावळे, उत्तम ओव्हा ळ, दीपक ठोसर, विकास गोमासे आणि हरिभाऊ आढळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • तसेच रामा ओव्हाळ, दादा बगाडे, प्रीतम ओव्हाळ, राम वाकचौरे, शाम गायकवाड, बाळू चतुर, दीपक गायकवाड, अनिल शिंदे, खंडू चाबुकस्वार, विश्वास लोकरे, श्रावण गण गे, भारत धेंडे, धनंजय सोनटक्के, किशोर वाघचौरे, दादा वडतिले, दयानंद बनसोडे, ॲड. दयानंद धेंडे, विजय रण दील, निळू बनसोडे, चंद्रपाल पालके, उमेश सोनवणे, नाना गोमासे, सचिन राऊत, अशोक खरात, बाबा गायकवाड, कानीफ सरपणे, बालाजी यशवद, तानाजी गोडखे यांच्या सह परंडा तालुक्यातील शेकडो समाजबांधव या नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • २८ जुलैचा मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावातून जनजागृ ती करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles