
कोकणातील वीजवाहिन्या भूमिगत करून नवीन सब-स्टेशन्स उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करा,खासदार रविंद्र वायकरांची संसदेत मागणी.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :-कोकणात मुसळधार पा ऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे दरवर्षी वीज पुरवठा खंडि त होण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले आहे.
- झाडे पडून विजेच्या तारा तुटणे,तासनतास वीज गेल्यामु ळे मोबाईल नेटवर्क ठप्प होणे,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुक सान होणे आणि स्थानिक व्यापारी व शेतकऱ्यांची होणा री आर्थिक हानी हा आपल्या कोंकणवासियांचा अत्यंत गंभीर प्रश्न खासदार रविंद्र वायकर यांनी संसदेत मांडला आहे.

- लोकसभा नियम ३७७ अन्वये लोकसभेत कोकणातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी आणि नवीन सब-स्टे शन्स उभारण्यासाठी विशेष निधी देण्याची आग्रही माग णी त्यांनी केली आहे.
- हा प्रस्ताव लोकसभेच्या पटलावर घेण्यात आला असून, या प्रश्नी तातडीने विशेष निधी मंजूर करण्यासाठी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांचेही लक्ष वेधले आहे.
- कोकणची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता,वीज वाहि न्या भूमिगत करणे हाच या समस्येवर कायमस्वरूपी उपाय आहे.
- तसेच कोकणातील जनतेला अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित विशेष निधी मंजूर करावा,यासाठी पाठपुरावा सुरू राहील.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






