महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे उत्साहात ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी व वारकरी दिंडी सोहळा संपन्न. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथे महात्मा गांधी शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून ग्रंथदिं डी, वृक्षदिंडी आणि वारकरी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहा त व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
  • कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
  • ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी विविध ज्ञानवर्धक पुस्तके, संविधा न,संत साहित्य आणि प्रेरणादायी ग्रंथांचे दर्शन घडवून “वा चन संस्कृती जोपासूया” हा संदेश दिला.
  • वृक्षदिंडीत विद्यार्थ्यांनी हातात रोपे घेऊन पर्यावरण संवर्ध न, वृक्षलागवड आणि निसर्ग संरक्षणाचा जागर केला. “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
  • यानंतर पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगा च्या गजरात, अभंग व हरिनामाच्या जयघोषात वारकरी दिंडी काढली.
  • विद्यार्थ्यांनी संतांच्या विचारांचा प्रसार करत भक्ती, समता, बंधुता आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
  • या सोहळ्यात शाळेचे मुख्याध्यापक काशीद सर, पर्यवेक्ष क प्रविण शेरे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्या र्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
  • कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी नियमित वाचन, पर्यावर ण संवर्धन आणि संतांच्या आदर्श विचारांचे आचरण कर ण्याची प्रतिज्ञा घेतली.
  • या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, पर्यावरणाबद्दलची जाणीव आणि वारकरी परंपरे बद्दल आदर निर्माण झाला.
  • संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles