संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- संतोष प्रतिष्ठान (रजि.),नाला सोपारा यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत रा जापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, सोगम वाडी येथे सोमवार दिनांक २० जुलै २०२६ रोजी.विद्यार्थ्यां च्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोफत नोटबुकचे वितरण तसे च संगणक भेट देण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला.
  • या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
  • तसेच शाळेला संगणक भेट देण्या त आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शि क्षणाची सुविधा उप लब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञा नाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास मोठी म दत होणार आहे.
  • यावेळी संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत, उपाध्यक्ष कृष्णा बावकर, सचिव सुनील शिवगण, सदस्य, पत्रकार व आडिवरे टाइम्सचे संपादक संदीप शेमणकर,प्रकाश चव्हा ण, अविनाश तांबट, शाळेचे शिक्षकवृंद, पालक आणि वि द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आधु निक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.
  • शाळेला संगणक भेट व विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वि तरण केल्याबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी संतो ष प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले.
  • ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व डिजिटल सक्षमीकरणा साठी संतोष प्रतिष्ठान राबवत असलेले असे उपक्रम समा जासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles