पिकअपच्या समोरासमोर धडकेत पिंपळवाडीतील तरुणाचा मृत्यू; परंडा पोलिसांत गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : फारूक शेख :-चुकीच्या दिशेने भरधाव वेगा ने येणाऱ्या पिकअप वाहनाने मोटरसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने एका ३४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
  • ही घटना १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खासगावच्या पुढे महावीर जगदाळे यांच्या शेता जवळ घडली.
  • अविनाश भिमराव होरे (वय ३४, रा.पिंपळवाडी, ता. परंडा ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, मयत अविनाश होरे हे दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आ पल्या मोटरसायकलवरून (क्र. एमएच १४ जेक्यु ११०७) प्रवास करत होते.
  • दरम्यान, खासगावच्या पुढे महावीर जगदाळे यांच्या शेता जवळ समोरून येणाऱ्या पिकअप चालकाने (क्र. एमएच १९ सीएक्स ४९६४) आपले वाहन हायगईने, निष्काळजी पणे आणि चुकीच्या दिशेने चालवून अविनाश यांच्या मोट रसायकलला समोरून जोरदार धडक दिली.
  • या भीषण अपघातात अविनाश होरे गंभीर जखमी होऊन मयत झाले.
  • या प्रकरणी किरण गौतम होरे (वय ३६, रा. पिंपळवाडी, ता.परंडा) यांनी दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी परंडा पोली स ठाण्यात फिर्याद दिली आहे.
  • त्यांच्या तक्रारीवरून संबंधित पिकअप चालकाविरुद्ध भा रतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५ (अ) (ब) सह मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) (ब),१८४ अन्व ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंडा पोलीस या प्रकर णाचा पुढील तपास करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles