जि.प.शाळा भामचंद्रनगर येथे आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,भामचंद्रनगर येथे पारंपरिक वारकरी संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्यामध्ये भक्ती, संस्कार, शिस्त व सामा जिक एकात्मतेची भावना रुजावी या उद्देशाने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात पार पडला.
  • कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूज न, दीपप्रज्वलन व अभंग गायनाने झाली. विद्यार्थ्यांनी वार करी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, भगवे ध्वज आ णि तुळशी वृंदावनासह दिंडीत सहभाग घेतला.
  • “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी”, “विठ्ठल विठ्ठल” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला.
  • दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ना मदेव, संत एकनाथ यांच्या जीवनकार्यावर आधारित संदे श फलक सादर केले.
  • पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, व्यसनमुक्ती, वृक्षसंवर्धन, पा णी बचत आणि सामाजिक ऐक्य यांसारखे समाज प्रबोध नाचे संदेशही विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे दिले.
  • उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे भरभरून कौतु क केले.
  • या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगे श घुले,शिक्षणतज्ञ रत्‍नाताई पिंगळे, तसेच शालेय व्यवस्था पन समितीचे सदस्य, शिंदे केंद्राच्या केंद्रप्रमुख छाया फ ल्ले,मुख्याध्यापिका शिल्पा मुजुमदार,शिक्षिका पायल अं बिके,रेखा वाघमारे,दत्तात्रय मोळवंडे तसेच पालक, गावा तील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उप स्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles