
प्रतापपूर येथे आषाढी एकादशी उत्साहात; दिंडी मिरवणूक, महापूजा व फराळ कार्यक्रमास भाविकांची मोठी उपस्थिती.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त प्रतापपूर गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गावाचे ग्रामदैवत श्री गोपालकृष्ण महा राज यांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली.
- सकाळी गावातून पारंपरिक टाळ-मृदंगाच्या गजरात आ णि विठ्ठल नामाच्या जयघोषात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली.

- या दिंडीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व ग्रामस्थांनी उत्स्फू र्त सहभाग घेत भक्तिभावाने श्री गोपालकृष्ण महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिरात विधिवत महापूजा संपन्न झाली.
- या धार्मिक सोहळ्यात गावातील ज्येष्ठ नागरिक यादवराव दोधु गांगुर्डे, सौर ऊर्जा प्रकल्पाचे अधिकारी श्री भूषण (खं डूभाऊ) यादवराव गांगुर्डे, गांगुर्डे परिवारातील सर्व सदस्य तसेच अनेक भाविक उपस्थित होते.

- श्री गोपालकृष्ण महाराजांवरील अपार श्रद्धेपोटी गांगुर्डे परिवाराने यापूर्वी महाराजांना चांदीचा मुकुट अर्पण केला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या वतीने फराळ कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले.
- पूजेनंतर सर्व ग्रामस्थांनी मंदिरात भक्तिभावाने दर्शन घेऊ न महाप्रसाद स्वरूपातील फराळाचा लाभ घेतला.
- या कार्यक्रमास कासारे ग्रामपंचायतीचे गटनेते तथा गव्हर्न मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री सचिन देसले, अविनाश खैरनार, नितीन खैरनार यांनी उपस्थित राहून श्री गोपालकृष्ण महाराजांचे दर्शन घेतले.
- यावेळी प्रतापपूर गावाचे माजी सरपंच धनराज शामराव गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, हर्षल ठाकरे, सुधीर गांगुर्डे, योगेश गांगुर्डे, उदय शिंदे, अशोक शिंदे, नितीन गांगुर्डे, सुरेश गांगु र्डे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- धार्मिक परंपरा, वारकरी संस्कृती आणि सामाजिक ऐक्या चे दर्शन घडविणारा हा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावर णात संपन्न झाला.
- दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत आयोजक श्री भूषण (खंडूभाऊ) यादवराव गांगुर्डे व गांगुर्डे परिवाराचे अभिनंद न केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






