
जंतरमंतर आंदोलनातील विद्यार्थ्याचा मृत्यू आणि सरकारी उदासीनता; नागरिकांमधून तीव्र संताप, लोकप्रतिनिधी गप्प का….?
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-दिल्लीतील जंतरमंत र येथे झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठी मारामध्ये एका गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्या ची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- या घटनेनंतर देशभरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्य क्त होत असून, ‘सरकारला फक्त खुर्चीची काळजी आहे का?’ असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित के ला जात आहे.

- लोकप्रतिनिधींच्या मौनावर प्रश्नचिन्हएकीकडे गरीब कुटुं बातील तरुण आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उत रून जीव गमावत असताना, दुसरीकडे आमदार आणि खासदार या गंभीर विषयावर पूर्णपणे गप्प का आहेत, अ सा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
- एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर राजकारण करणारे नेते एव ढ्या मोठ्या दुर्घटनेवर मौन बाळगून असल्याने नागरिकां मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
- ‘नेत्यांची मुले असती तर लगेच मदत मिळाली असती'”जर या लाठीमारामध्ये एखाद्या बड्या नेत्याचे किंवा मंत्र्याचे मू ल असते, तर सरकारने आतापर्यंत तातडीने कोट्यवधी रु पयांची मदत आणि सरकारी नोकरी जाहीर केली असती,” अशी थेट आणि उलट-सुलट चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
- मृत विद्यार्थी हा गरीब घराण्यातील असल्यानेच सरकार कडून आणि प्रशासनाकडून या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.
- केवळ सत्तेचा खेळ, गरिबांच्या जिवाची किंमत शून्य…?आंदोलकांचे म्हणणे आहे की, सरकारला केवळ आपली सत्ता टिकवण्यात रस आहे.
- जंतरमंतरवर जीव गमावलेल्या त्या निष्पाप विद्यार्थ्याच्या कुटुंबाशी आणि त्यांच्या दुःखाशी सरकारला काहीही देणे-घेणे उरलेले नाही.
- या संवेदनशील घटनेमुळे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनि धींच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत जाहीर क रावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






