आषाढी एकादशी निमित्त शाळेत अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- आषाढी एकादशीचे औ चित्य साधून आणि महाराष्ट्राची थोर संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचव ण्यासाठी पी.ई.एस.मॉडर्न प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कू ल येथे नुकत्याच अभंग व भजन स्पर्धा आयोजित करण्या त आल्या होत्या.
  • कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल भक्तीपर अ भंग आणि भजने सादर करून संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.
  • स्पर्धेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांची वेशभूषा, चाल, लय आणि भक्तीभाव पाहून उपस्थित परिक्षक आणि शिक्षक मंत्रमुग्ध झाले.
  • कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि परिक्षक म्हणून संगीत विशारद श्रृतिका कुलकर्णी उपस्थित होत्या. त्यांनी आप ल्या भाषणात आषाढी एकादशीचे महत्त्व आणि वारकरी परंपरा याबद्दल मार्गदर्शन केले.
  • विद्यार्थ्यांना त्यांनी संगीत विषयक माहिती दिली व सर्वांनी संगीत हे एक छंद म्हणून जोपासावे असेही त्यांनी सांगितले.
  • कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना पगारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजा रे यांनी विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले व शिक्षिका शीतल कोराड यांनी विशेष परिश्रम घेतले.
  • शेवटी सर्वांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानबा तुकाराम” च्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.
  • संस्थेचे सहकार्यवाह श्री. शामकांत देशमुख सर , शाळेचे व्हिजिटर प्रो.डॉ.अतुल फाटक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
  • तसेच  संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे व सह कार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.नि वेदिता एकबोटे यांनी मुलांचे कौतुक केले आणि भावी का रकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles