परंडा तालुक्यात संताप लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला…! रोसा येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था; मूलभूत सुविधांचा बोजवारा, पालकांमध्ये तीव्र संताप .

  • प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- तालुक्यातील रोसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अत्यंत दुरवस्थे मुळे येथील विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
  • राजकीय नेते आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या शाळेला सध्या अवकळा आली असून, संत प्त पालकांनी “उद्या आमच्या लेकरांना बरे-वाईट झाल्यास जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल प्रशासनाला विचा रला आहे.
  • मूलभूत सुविधांचा बोजवारा; विद्यार्थिनींची प्रचंड गैरसोय शाळेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी साधे स्वच्छ पाणीही उप लब्ध नाही.
  • सर्वात गंभीर बाब म्हणजे वापरासाठी शौचालय नसल्या मुळे, विशेषतः विद्यार्थिनींची प्रचंड कोंडी आणि गैरसोय होत आहे.
  • शाळा परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, या मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • पडक्या वर्गखोल्या अन् विंचू-काट्याची भीतीशाळेची इमारत पूर्णपणे खिळखिळी झाली आहे.
  • वर्गखोल्यांची दुरवस्था झाली असून, अनेक वर्षांपासून को णतीही दुरुस्ती झालेली नाही. छताचे सिमेंट आणि भिंतीं चे पापुद्रे सातत्याने निखळत आहेत.
  • तसेच, शाळेच्या आवारात अस्ताव्यस्त वाढलेल्या झुडपां मुळे सर्प आणि विंचू-काट्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.
  • अशा अत्यंत धोकादायक स्थितीत निष्पाप मुले मृत्यूच्या छायेत शिक्षण घेत आहेत. बालवाडी/अंगणवाडीचीही ती च व्यथाशाळेला जोडून असलेल्या अंगणवाडीची अवस्था तर याहून बिकट आहे.
  • येथील लहान बालकांसाठी बसण्याची, पिण्याच्या पाण्या ची किंवा खेळण्याची कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. प्रशासनाने या कोवळ्या जिवांकडेही पूर्णपणे पाठ फिरव ली असल्याचे चित्र येथे पाहायला मिळत आहे.
  • नेते फक्त निवडणुकीपुरतेच; गावकऱ्यांचा आरोप” नेतेमंड ळी फक्त निवडणुकीच्या काळात मते मागण्यासाठी येतात.
  • मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या या गावाला निवडणुकीनंत र मात्र वाऱ्यावर सोडले जाते,” असा आरोप स्थानिक ग्राम स्थांनी केला आहे.
  • प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन शाळेची दुरुस्ती न केल्यास, येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रोसा येथील पालक आणि गावकऱ्यांनी दिला आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles