
देशीरवाडे येथील पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धरणाचे पाणी सोडण्याची मागणी.
- प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- सटाणा–पिंपळनेर राष्ट्रीय म हामार्गावरील देशीरवाडे गावाजवळ पांझरा कालव्यावरील रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून लाटीपाडा धर णाचे पाणी पांजरा कालव्यातून सोडण्यात यावे, अशी मा गणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार, साक्री यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यंदा साक्री तालु क्यातील १६ गाव काटवाण परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊ स झालेला नसल्याने नाले, बंधारे आणि जलसाठे अद्याप ही कोरडे आहेत.

- त्यामुळे खरीप हंगामातील पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- लाटीपाडा धरणात उपलब्ध असलेले पाणी पांझरा काल व्यातून सोडल्यास परिसरातील बंधारे, विहिरी व जलस्रो तांना मोठा दिलासा मिळेल.
- मात्र देशीरवाडे गावाजवळ पांझरा कालव्यावरील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने पाणी सोडण्यात अडथळा निर्माण होत आहे.
- त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पाटबंधारे विभागा ने समन्वय साधून देशीरवाडे येथील कालव्यावरील रस्त्या चे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे व त्यानंतर लाटीपाडा धरणाचे पाणी तात्काळ पांझरा कालव्यातून सोडावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
- यामुळे दिघावे, छाईल, प्रतापपूर, नाडसे, निळगव्हाण,विटा ई, सायने, बेहेड, गणेशपूर, कासारेसह संपूर्ण १६ गाव का टवाण परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- विशेष म्हणजे, १६ गाव काटवाण परिसरातील सरपंचांची स्वतंत्र निवेदनाद्वारे या मागणीस जाहीर पाठिंबा देत प्रशा सनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
- त्यामुळे या प्रश्नाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती आणि शेतकरी संघटनांचा व्यापक पाठिंबा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
- महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.युवराज काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन तहसीलदार, साक्री यांना सादर करण्यात आले.
- यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे किसान सेल जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अ जित पवार) पक्षाचे किसान सेल तालुकाध्यक्ष रवींद्र देस ले, धनंजय देसले, मयुर देसले तसेच अनिल तोरवणे उप स्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






