
रा. गे. शिंदे महाविद्यालयात 31 जुलै रोजी मेगा बँकिंग करिअर कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शिक्षण महर्षी गुरुव र्य रा. गे. शिंदे महाविद्यालय, परांडा येथे विद्यार्थ्यांसाठी मे गा बँकिंग करिअर कॅम्पस ड्राइव्ह 2026 चे आयोजन करण्यात आले आहे.
- हा उपक्रम IBFSA यांच्या सहकार्याने शुक्रवार, दि. 31 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता महाविद्यालय परिसरात होणार आहे.
- या कॅम्पस ड्राइव्हमध्ये देशातील अग्रगण्य खासगी क्षेत्रा तील ICICI बँक आणि Axis बँक या नामांकित बँकांमध्ये करिअरची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- पदवीधर विद्यार्थ्यांना थेट बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी मिळावी, या उद्देशाने या भरती प्रक्रियेचे आयोजन करण्या त आले आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जा धव यांनी कळविले आहे.
- ICICI बँकेमध्ये रिलेशनशिप मॅनेजर (On-roll) पदासाठी भरती होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात नियुक्ती दिली जाणार आहे.
- या पदासाठी पूर्णवेळ पदवीधर, किमान 50 टक्के गुण, व य 25 वर्षांपर्यंत, 12 महिन्यांपेक्षा कमी अनुभव तसेच वि क्री क्षेत्रात काम करण्याची आणि महाराष्ट्रात कुठेही बद ली स्वीकारण्याची तयारी असणे आवश्यक आहे.
- निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक ₹3.12 ते ₹3.84 लाख CTC दिले जाणार आहे.
- Axis बँकेमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह पदा साठी भरती होणार असून 2021 ते 2026 या कालावधी त पदवी प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
- वयोमर्यादा 21 ते 27 वर्षे असून उमेदवाराकडे दुचाकी वा हन व वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे बंधनकारक आहे.
- या पदासाठी वार्षिक ₹2.39 लाख वेतनासह आकर्षक प्रोत्साहनपर रक्कम (Incentives) देण्यात येणार आहे.
- या कॅम्पस ड्राइव्हसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारी ख 30 जुलै 2026 असून इच्छुक विद्यार्थ्यांनी दिलेल्या नों दणी लिंकद्वारे आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन प्लेसमेंट सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
- महाविद्यालयाचे प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा.डॉ.अरुण खर्डे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क करावा महावि द्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील जाधव उपप्राचार्य डॉक्टर महेश कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- अधिक माहितीसाठी प्रणव कापसे (मो. 8208799014) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
- या उपक्रमामुळे परंडा व परिसरातील पदवीधर विद्यार्थ्यां ना नामांकित बँकांमध्ये करिअर घडविण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्या वा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






