
करमाळा-परंडा. रस्त्यावरील रोसा स्टॉपवर एसटी बसेस थांबत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल; प्रशासनाने दखल घेण्याची मागणी.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- करमाळा-परंडा मुख्य रस्त्या वरील रोसा येथील अधिकृत बस स्थानकावर करमाळा आणि परंडा भूम आगाराच्या बसेस थांबत नसल्याने प्रवा सी, ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
- यामुळे संतप्त प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, या ठिकाणी तिन्ही आगारांनी अधिकृत थांबा (स्टॉप) द्या वा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानसध्या राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आणि महिलां ना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली आहे.

- सध्या शाळा-महाविद्यालये सुरू असल्याने रोसा परिसरा तील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी करमाळा किंवा परंडा येथे ये-जा करतात.
- मात्र, चालक या ठिकाणी बसेस थांबवत नसल्याने विद्या र्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचता येत नाही. परिणामी, वि द्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
- रोसा तिकीट देण्यास वाहकांचा नकार; डोमगाव फाट्याचे तिकीट देऊन प्रवाशांची लूटप्रवाशांनी दिलेल्या माहितीनु सार, परंड्याहून बसमध्ये चढल्यानंतर प्रवासी जेव्हा रोसा येथील तिकीट मागतात, तेव्हा करमाळा आगाराचे वाहक (कंडक्टर) रोसाचे तिकीट देण्यास नकार देतात.
- प्रवाशांना थेट पुढच्या म्हणजेच ‘डोमगाव फाटा’ येथील ति कीट सक्तीने दिले जाते. रोसा येथे गाडी थांबवणे टाळण्या साठी वाहक आणि चालकांकडून हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
- यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लाग त आहे.रात्री आठ नंतर बसेस नसल्याने गैरसोयरोसा फा टा येथे संध्याकाळी आठ वाजेनंतर एकही बस उपलब्ध नसते.
- त्यामुळे कामानिमित्त बाहेर गेलेल्या नागरिकांना, महिलां ना आणि प्रवाशांना रात्रीच्या वेळी ताटकळत उभे राहावे लागते किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो.
- रात्रीच्या वेळी वाहतूक व्यवस्था नसल्याने प्रवाशांच्या सुर क्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
- नागरिकांची प्रशासनाकडे मागणीरोसा हे मुख्य रस्त्यावरी ल महत्त्वाचे ठिकाण असून, परिसरातील अनेक गावांसा ठी हा मुख्य थांबा आहे. त्यामुळे करमाळा आणि परंडा तिन्ही आगारांच्या प्रमुखांनी याची गंभीर दखल घ्यावी.
- रोसा स्टॉपवर सर्व बसेस थांबवण्याचे लेखी आदेश चाल क-वाहकांना द्यावेत आणि प्रवाशांना होणारा त्रास त्वरित थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्था निक ग्रामस्थ व प्रवाशांनी दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






