परंड्यात दोन वर्षांपासून जन्म दाखले रखडले; ६ ऑगस्टपासून सादातअली काझी उपोषणास बसणार.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- परंडा तालुका आणि शहरा तील नागरिकांनी सर्व आवश्यक पुरावे आणि सविस्तर अर्ज देऊनही मागील दोन वर्षांपासून त्यांचे जन्म दाखले तहसील कार्यालयात धूळ खात पडून आहेत.
  • वारंवार चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने नागरि कांचा वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.
  • या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने तात्काळ तोडगा न काढल्या स येत्या ६ ऑगस्ट २०२६ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यक र्ते सादातअली महेबुबअली काझी यांनी जिल्हाधिकाऱ्यां ना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
  • याबाबत सविस्तर वृत्त असे की, परंडा येथील रहिवासी सादातअली काझी यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक तक्रार अर्ज सादर केला आहे.
  • या अर्जात त्यांनी म्हटले आहे की, परंडा तहसील कार्याल यात जन्म नोंदीच्या शेकडो फाईल्स गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत.
  • नागरिक जेव्हा आपले दाखले मागण्यासाठी कार्यालयात जातात, तेव्हा संबंधित विभागाकडून प्रत्येक वेळी काही ना काही किरकोळ त्रुटी काढून त्यांना परत पाठवले जाते.
  • दोन वर्षे उलटूनही या फाईल्सवर कोणतीही कायदेशीर प्रक्रिया करण्यात आलेली नाही.प्रशासनाच्या या दिरंगाई मुळे सामान्य नागरिकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
  • दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे व नागरिकांची अनेक महत्त्वा ची कामे रखडली आहेत.
  • ५ ऑगस्टपर्यंत आदेश देण्याची मागणीया संपूर्ण प्रकरणा ची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यां वर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी माग णी काझी यांनी केली आहे.
  • तसेच प्रशासनाने येत्या ५ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रलंबित जन्म नोंदींचे आदेश पारित करावेत, अशी मुदतही त्यांनी निवेदनात दिली आहे.
  • प्रशासनाविरोधात उपोषणाचा इशाराजर ५ ऑगस्टपर्यंत नागरिकांना न्याय मिळाला नाही, तर ६ ऑगस्ट २०२६ पासून परंडा तहसील कार्यालयासमोर तीव्र उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा सादातअली काझी यांनी दिला आहे.
  • या उपोषणामुळे होणाऱ्या सर्व कायदेशीर व प्रशासकीय परिणामांची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील, असे ही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
  • या निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभा गीय अधिकारी भूम, पोलीस निरीक्षक परंडा आणि तहसी लदार परंडा यांना माहितीसाठी व योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles