
“अहेरीकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आवाज बुलंद! नियमित व स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी संबंधित विभागाला निवेदन.”
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :- अहेरी शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा दर दोन दिवसा आड होत असून तो ही अनियमित वेळेत केला जात आहे.
- तसेच अनेक भागांत नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
- या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाकडे निवेदन सादर क रून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

- निवेदनात म्हटले आहे की, अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह दैनंदिन वापरासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- गढूळ पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्मा ण झाला असून जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
- अहेरी शहरात नियमित व दररोज पाणीपुरवठा सुरू करा वा, पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ जाहीर करून तिचे काटे कोर पालन करावे, स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.
- तसेच गढूळ पाणी येण्यामागील कारणांची तातडीने चौक शी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेद नाद्वारे करण्यात आली आहे.
- यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन दिगंबर येरोजवार, आ युष सुनील मामीडवार, अतुल उइके, सेवानिवृत्त शिक्षक दामोधरजी राऊत आणि कुसराम उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






