विषय: ऑटो रिक्षाच्या नवीन भाडेवाढीचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीतर्फे स्वागत.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- खटवा समितीच्या सूत्रानुसा र भाडेवाढ लागू डॉ बाबा कांबळे, यांची माहिती, मीटर प्र माणे भाडे आकारण्याचे रिक्षा चालकांना डॉ.बाबा कांबळे यांचे आवाहन, जास्त भाडे सांगू नका भाडे नाकारू नका, असेही केले.
  • आवाहन, पुणे: पिंपरी चिंचवड खटवा समितीच्या शिफा रशीनुसार आणि सूत्रानुसार ऑटो रिक्षाच्या भाड्यात कर ण्यात आलेल्या नवीन भाडेवाढीचे ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’ च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे.
  • वाढती महागाई, गॅसचे सतत वाढलेले दर, स्पेअर पार्टचे वाढलेले भाव आणि महागाई निर्देशांक विचारात घेऊन ही सुधारित भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
  • या नवीन सूत्रानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये (पूर्वी २५ रुपये होती) आणि त्यानंतर पुढील प्र त्येक किलोमीटरसाठी २० रुपये (पूर्वी १७ रुपये होती) असे सुधारित भाडे असणार आहे.
  • प्रति किलोमीटर मागे ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. देशात प्रथमच महाराष्ट्रात हकीम आणि ‘खटवा समिती’ची स्थापना – डॉ. बाबा कांबळे यांचा ऐतिहासिक लढा.
  • या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा कांबळे यांनी सांगितले की, “पूर्वी ऑटो रिक्षाची भाडेवाढ करण्या साठी रिक्षा चालकांना वर्षानुवर्षे मोठा संघर्ष करावा लाग त होता.
  • परंतु, आमच्या अथक परिश्रमांमुळे आणि अभ्यासपूर्ण मां डणीमुळे देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये’हकीम समिती’ आणि त्यानंतर ‘खटवा समिती’ स्थापन करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडले.
  • आता संघर्षाची गरज उरलेली नाही, तर ठरलेल्या धोरण आणि सूत्रानुसार स्वयंचलित पद्धतीने भाडेवाढ होत आहे. ही कष्टकरी रिक्षा चालकांच्या दिर्घकालीन लढ्याची मोठी यशस्वी पावती आहे.”
  • रिक्षा चालक-मालकांना शिस्तीचे आवाहन
  • भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे सं स्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सर्व रिक्षा चालक आणि मालकांना अत्यंत मोलाचे आवाहन केले आहे:
  • “आता सर्व रिक्षा चालक-मालकांनी कोणत्याही वादात न पडता फक्त मीटरनेच व्यवसाय करावा, रिक्षा मीटरनेच चा लवावी, प्रवाशांकडे जास्त भाडे मागू नये आणि कोणत्या ही प्रवाशाला भाडे नाकारू नये.
  • नवीन भाडेवाढीचा लाभ घेत असताना ग्राहकांशी व प्रवा शांशी उत्तम व आदराची वागणूक ठेवावी, जेणेकरून रि क्षा चालकांची प्रतिमा अधिक उजळून निघेल.”
  • या धोरणात्मक भाडेवाढीमुळे राज्यातील लाखो ऑटो रि क्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे समाधान व्यक्त केले आहे.
  • निवेदक: महाराष्ट्र रिक्षा पंचायत
  • संस्थापक : गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते
  • अध्यक्ष: डॉ. बाबा कांबळे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles