
परंडा शहरातील वाहतूक कोंडी फुटणार? नवीन डी.पी. रस्त्यासाठी व्यापाऱ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना / नगरअध्य यांना निवेदन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा शहराला जोडणाऱ्या मुख्य सोनारी रस्त्यावरील आगरकर गल्ली, मोमीन गल्ली आणि मंडई पेठ भागातील तीव्र वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.
- शहराच्या नियोजित विकास आराखड्यातील (डी.पी. रोड) महेदीया दायरा ते छत्रपती संभाजी महाराज चौक हा रस्ता नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेऊन त्वरित विकसित करावा.

- या मागणीचे निवेदन परंडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी / विकास मंत्री नगर रत्न विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई जिल्हा धिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव तहसील दार तहसील कार्यालय परांडा नगराध्यक्ष नगरपरिषद परं डा विरोधी पक्षनेता नगर नगरपरिषद परंडा यांना देण्यात आले.
- या निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री, नगराध्यक्ष, जिल्हा धिकारी धाराशिव आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
- सध्याची भौगोलिक अडचण आणि वाहतूक कोंडीभौगो लिकदृष्ट्या परंडा शहर हे पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले आहे.

- शहराच्या उत्तरेकडील सोनारी रस्ता हा मुख्य मार्ग असून, या मार्गाने तालुक्यातील ३० ते ४० गावे परंडा शहराशी जोडलेली आहेत.
- सध्या हा रस्ता आगरकर गल्ली आणि मोमीन गल्ली मार्गे मंडई पेठेत येतो. हा भाग अत्यंत अरुंद असल्याने चारचा की व अवजड वाहनांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होते, ज्यामुळे शहरात सतत ट्रॅफिक जामची सम स्या उद्भवते.
- शहराच्या मध्यभागी असलेला मोठा गाव तलाव आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक भुईकोट किल्ला यामुळे अव जड वाहनांना संपूर्ण शहराला वळसा घालून मंडई पेठेत यावे लागते.
- यामुळे वेळेचा आणि इंधनाचा मोठा अपव्यय होतो.नवीन डी.पी. रस्त्याचे महत्त्वव्यापाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, जर महेदीया दायरा ते छत्रपती संभाजी महाराज चौक(पुढे टिपू सुलतान चौकापर्यंत) हा नवीन डी.पी.रस्ता नगर परिषदेने समाविष्ट करून विकसित केला, तर शहरा ला एक उत्तम बायपास आणि कनेक्टिव्हिटी मिळेल.
- या नवीन विस्तारामुळे:शहरांतर्गत होणारी अवजड वाहनां ची वाहतूक पूर्णपणे बाहेरून वळवता येईल. मंडई पेठ आणि बाजारपेठेतील अंतर्गत वाहतूक कोंडी कायमची दूर होईल.
- ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना दळणवळण करणे सोपे होईल.परंडा शहराचा समतोल आणि सुनियोजित विकास होण्यास मोठी मदत होईल.
- प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणीशहराच्या व्यावसायिक आणि सामाजिक हिताचा विचार करून परंडा नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी आणि नवीन डी.पी.रस्त्याच्या कामाची पुढील काय देशीर व तांत्रिक प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी आग्र ही मागणी परंडा शहरातील समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

- यावेळी अभय देसाई सुयोग शहा, जितेंद्र जलाराम, चांदपा शा शेख, ऑफिस करपुडे, ततनवीर डोंगरे, पांडू कासार, नितीन विटकर . नुसरत करपुडे . बालाजी बुलबुले . राज शेख, एजाज बागवान, मन्सूर बहिरे, डॉक्टर अमोल, सिर सागर. शहाबाज हानूरै नगरसेवक वाजीद दखनी खय्युम तुटके अजहर शेख तय्यब भाई शेख जुबेर पठाण रहिम करपुढे इत्यादी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






