कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली मोठी कारवाई…!धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा,15 कृषी अधिकारी निलंबित; 2.32 कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी, त्यांना जेलमध्ये टाका आमदार कैलास पाटील.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- धाराशिव जिल्ह्या तील कृषी विभागाच्या एकात्मिक कीड व्यवस्थापन (IP M) व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) योजनां मध्ये झालेल्या कथित मोठ्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य शासनाने कठोर कारवाई करत 15 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे.
  • चौकशी अहवालाच्या आधारे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी ही कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात यापूर्वी 17 अधिकारी दोषी ठरविण्यात आ ले होते.
  • त्यापैकी 15 जणांना निलंबित करण्यात आले असून, सु मारे 2 कोटी 32 लाख रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्य वहाराची नोंद चौकशीत करण्यात आली आहे.
  • संबंधित अधिकाऱ्यांकडून रकमेची वसुली करण्याबरोबर च त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही जोर धरत आहे.
  • मयत, भूमिहीन व दुबार लाभार्थ्यांच्या नावाने निविष्ठा वाटप चौकशीत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.
  • कृषी योजनांअंतर्गत मयत, भूमिहीन, दुबार तसेच बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावाने कृषी निविष्ठांचे वाटप कर ण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
  • याशिवाय शेतकरी प्रशिक्षण,शेडनेट, सेवा वर्ग आणि अन्य योजनांमध्येही अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
  • आमदार कैलास पाटील यांच्या तक्रारीमुळे झाली मोठी कारवाई.या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा आमदार कैलास पाटील यांनी केला होता.
  • तसेच शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी धाराशिव आणि पुणे येथील कृषी विभागाच्या कार्यालयांवर आंदोल न करून या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती.
  • त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.
  • जिल्ह्यातील अनेक अधिकारी जबाबदार चौकशीत 2 जि ल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी आणि 4 मंडळ कृषी अधिकारी यांच्यासह एकूण 17 अधिकाऱ्यां ना जबाबदार धरण्यात आले आहे.
  • यामध्ये प्रभारी कृषी उपसंचालक पुरुषोत्तम वाघमारे, जि ल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे, तत्कालीन प्रभारी कृ षी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी महादेव असलकर, जिल्हा सल्लागार सतीश सुरवसे, तंत्र अधिका री राहुल दिवाणे, सहायक कृषी अधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्यासह विविध तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
  • परंडा तालुक्यात 33.40 लाखांचा कथित गैरव्यवहार चौ कशी अहवालानुसार तालुकानिहाय कथित गैरव्यवहारा ची रक्कम पुढीलप्रमाणे आहे:
  • – धाराशिव – ₹44.25 लाख
  • – तुळजापूर – ₹44.00 लाख
  • – परंडा – ₹33.40 लाख
  • – कळंब – ₹33.40 लाख
  • – भूम – ₹22.45 लाख
  • – लोहारा – ₹22.37 लाख
  • – वाशी – ₹21.45 लाख
  • – उमरगा – ₹10.65 लाख
  • 76 पानी चौकशी अहवाल सादर
  • 2025-26 या हंगामात कृषी विभागामार्फत वितरित कर ण्यात आलेल्या कृषी निविष्ठा व फवारणी किटच्या वितर णात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे चौकशीत नमूद करण्यात आले आहे.
  • लातूर जिल्ह्याचे कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी या प्रकरणाचा 76 पानी चौकशी अहवाल कृषी आयुक्तांकडे सादर केला असून, त्यानंतर निलंबनाची कारवाई करण्या त आली आहे.
  • दरम्यान, या प्रकरणात केवळ निलंबन न करता दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाच्या निधीची वसुली करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व आंदोलकांकडून होत आहे.
  • या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करण्याची तया रीही सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles