
रायपाटण येथे ९ ऑगस्ट रोजी मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिर.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- दिवालीबेन मोहन लाल मेहता लायन्स आय हॉस्पिटल, रत्नागिरी आणि शिवप्रेमी मित्र मंडळ रायपाटण,ता. राजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

- सदर शिबिर रविवार दि ९ ऑगस्ट २०२६ रोजी स.९ ते दु २ या वेळेत श्री राम मंदिर,रायपाटण येथे होणार आहे या शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत/सवलतीच्या दरात/ दुर्बिणीद्वारे केली जाणार आहे.
- शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधी नाव नोंदणी करणे आ वश्यक आहे अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी मंगेश पराडकर – ९२७३८०८६६६, प्रकाश पाताडे – ८६६८९५ २०८८, कुणाल गांगण – ९२०९८९०२७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






