ढगपिंपरी येथील दर्गाह परिसरातील पाण्याची समस्या नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्याकडून तात्काळ मार्गी; दिलेल्या शब्दाला जागल्याने ग्रामस्थांकडून कौतुक.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- ढगपिंपरी:ढगपिंपरी येथील हजरत दाउल मलिक साहब रहेमतुल्लाह अलैह द र्गाह आणि मस्जिद परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भे डसावणारी पाण्याची गंभीर समस्या अखेर कायमची मिट ली आहे.
  • परंडा नगरीचे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांनी सामा जिक बांधिलकी जपत स्वतःच्या सौजन्याने या परिसरात बोअरवेलची व्यवस्था करून दिली आहे.
  • त्यांच्या या तत्परतेमुळे “दिलेला शब्द पाळणारा नेता” म्ह णून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
  • ढगपिंपरी येथे नुकत्या च पार पडलेल्या उर्सच्या दिवशी छावा संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख, स्थानिक ग्रामस्थ आणि उर्स कमिटीने दर्गाह परिसरातील पाण्याच्या समस्येकडे नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांचे लक्ष वेधले होते.
  • नागरिकांची ही अडचण समजून घेताच जाकीरभाईंनी त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
  • आपल्या कार्यतत्परतेचा प्रत्यय देत, नगराध्यक्षांनी उर्सच्या दुसऱ्याच दिवशी दर्गाह परिसरात बोअरवेल घेण्याची व्यवस्था केली.
  • बोअरला पाणी लागल्यामुळे आता दर्गाह आणि मस्जिद परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे.
  • अनेक वर्षांची समस्या अवघ्या २४ तासांत सोडविल्याबद्द ल ढगपिंपरीचे ग्रामस्थ आणि उर्स कमिटीच्या वतीने नगरा ध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांचे जाहीर आभार मानण्यात आले.
  • “शब्द दिला आणि दुसऱ्याच दिवशी तो पूर्ण केला,” अशी चर्चा सध्या संपूर्ण परंडा तालुक्यात सुरू आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles