कृषी ज्ञानाचा जागर; कुटरेत RAWE विद्यार्थिनींचे आगमन…! शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन; विविध कृषी उपक्रमांना सुरुवात.

  • प्रतिनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली अंतर्गत राबविण्या त येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमा अंतर्गत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय येथील कृषी विद्यार्थिनींचे कुटरे गावात आगमन झाले आहे.
  • या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्य क्ष संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणा र आहेत.
  • या उपक्रमांतर्गत सेंद्रिय शेती,नैसर्गिक शेती,गांडूळ खत व कंपोस्ट खत निर्मिती, पीक संरक्षण, फळबाग व्यवस्थापन, मृदा व पाणी संवर्धन तसेच विविध शासकीय कृषी योज नांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.
  • याशिवाय शेतभेटी, प्रात्यक्षिके, माहिती केंद्र, वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • ग्रामपंचायत कुटरे येथे विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत कर ण्यात आले.
  • यावेळी प्रशासक संजीवकुमार गुजर यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमा स शुभेच्छा दिल्या.
  • तसेच गावातील शेतकऱ्यांनी विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
  • या विद्यार्थी कोण
  • या ग्रामीण कृषी कार्यानुभवात शरदचंद्रजी पवार कृषी म हाविद्यालय खरवते येथील श्रुती येरलकर, ऋतुजा गायक वाड, ईश्वरी कुरणे, मनस्वी पाटील, अंशिता फडतरे या वि द्यार्थीनी सहभागी होणार आहेत.
  • RAWE म्हणजे काय? RAWE (Rural Agricultural Work Experience) हा कृषी शिक्षणाचा महत्त्वाचा भा ग असून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची, त्यांच्या समस्या समजून घेण्या ची आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळते.
  • “या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी नवी न माहिती मिळेल. विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा”- ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ,ग्रामपंचायत कुटरे RAWE उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन घराजवळ उपलब्ध होणार आहे.
  • ग्रामपंचायत या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल.”- प्रशासक संजीवकुमार गुजर,ग्रामपंचायत कुटरे
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles