चांदवडच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश.

  • प्रतिनिधी : राजाराम खांगळ :- चांदवड पंचायत समि तीचे गट विकास अधिकारी मच्छिंद्र आप्पासाहेब साबळे यांच्या कामकाजातील घरकुल व इतर कथित भ्रष्टाचार घो टाळा व अनियमित गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडे सातत्या ने तालुक्यातून तक्रारी होत होत्या अखेर सदर प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधि कारी ओमकार पवार यांनी सखोल चौकशीचे आदेश देऊ न चौकशी समिती गठीत केली आहे.
  • या चौकशी समितीमध्ये अध्यक्ष म्हणून बागलाणचे गट वि कास अधिकारी अतुल जयवंतराव पाटील, सदस्य म्हणून उप अभियंता हेमंत देवरे, सदस्य सचिव म्हणून विस्तार अ धिकारी राजेंद्र पाटील आणि मदतनीस म्हणून वरिष्ठ सहा य्यक दिपक काशिनाथ शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संबंधित चौकशी समितीला पुढील पंधरा दिवसांच्या आत सखोल चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि विभागीय आयुक्त कार्यालयाच्या पत्रव्यवहारानंतर अखेर हे आदेश निघाल्याने, या नियुक्त समितीने गट विकास अधिकाऱ्यांच्या सर्व कारभाराची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिक व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles