
परंड्यात दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न; ६२ दिव्यांग लाभार्थ्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- महाराष्ट्र शासनाच्या उपजिल्हा रुग्णालय, परंडा आणि दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परंडा तालुक्यातील तसेच शहरातील दिव्यां ग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

- शिबिरामध्ये अस्थिव्यंग, फिजिशियन, अंध तसेच मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांची धाराशिव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली.
- प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही पुढील कार्यवाहीसाठी जमा करून घेण्यात आली.
- यावेळी अस्थिव्यंग विभागाचे डॉ. बाराते यांनी २८, फिजि शियन तज्ज्ञ डॉ.रेवडकर यांनी ५,अंध विभागाचे डॉ.पाटी ल यांनी ११ आणि मतिमंद विभागाचे डॉ. शिंदे यांनी १८, अशा एकूण ६२ दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी केली.
- या शिबिरासाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्याचे रा ज्याध्यक्ष तानाजी घोडके उपस्थित होते. तालुक्यातील अ नेक दिव्यांग बांधवांनी शिबिरात सहभागी होत आपली प्रमाणपत्र तपासणी करून घेतली.
- शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी परंडा ग्रामीण रुग्णाल यातील डॉ. मोमीन तसेच रुग्णालयातील अधिकारी व क र्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
- दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या शासकीय सुविधा आणि योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने पा ठपुरावा करणाऱ्या तानाजी घोडके यांच्या पुढाकाराचे उप स्थित दिव्यांग बांधवांनी कौतुक केले.
- प्रमाणपत्र तपासणीसाठी तालुक्याच्या ठिकाणीच तज्ज्ञ डॉक्टरांची सुविधा उपलब्ध झाल्याने दिव्यांग लाभार्थ्यांची मोठी गैरसोय टळली.

- “दिव्यांग सेवक… आपला हक्काचा माणूस” अशी भावना यावेळी दिव्यांग बांधवांमध्ये व्यक्त होत असून, तानाजी घो डके यांच्या सामाजिक कार्याची परिसरात चर्चा होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






