खो-खो तालुकास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा यशाची परंपरा कायम ; १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांची जिल्हास्तरासाठी दिमाखात निवड.

  • प्रतिनीधी : फारुख शेख :-दि.१९ सप्टेंबर २०२६ येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्या लयाच्या १४ वर्षे व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत दणदणीत विजय मिळविला.
  • या उल्लेखनीय कामगिरीमुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  • तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन महात्मा गांधी वि द्यालय, परंडा येथे करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पं चायत समिती सभापती अण्णासाहेब जाधव यांच्या अध्य क्षतेखाली झाले.
  • प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद, उद्योजक अ मर साळुंखे, पंचायत समिती सदस्य अमोल नलवडे, रोस्या चे सरपंच रवींद्र नलवडे, माजी मुख्याध्यापक दिलीप शेरे, क्रीडा संयोजक सचिन पाटील आणि प्रशालेचे पर्यवेक्षक प्रवीण शेरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
  • यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक शशिकां त नलावडे, उत्तरेश्वर सूर्यवंशी, पुरुषोत्तम डोंबाळे, तसेच संघाचे प्रशिक्षक राहुल काशीद व विठ्ठल शेळके उपस्थित होते.
  • जय हनुमान विद्यालय, वाटेफळचे शिक्षक तानाजी हजारे, जिल्हा परिषद शाळा जवळा येथील शिक्षक श्रीराम घोड के, पंच ज्योतीराम गिरवले, रावसाहेब विद्यालयाचे शिक्षक करंडे सर, नवीन माध्यमिक विद्यालय, रोहकलचे शिक्षक उंबरे सर, रत्नापूर शाळेचे शिक्षक तरंगे सर, संत मीरा शा ळेचे शिक्षक काळे सर, पवित्राताई दैठणकर, रत्नापूर शा ळेचे शिंदे सर, सहसंयोजक महेश शिंदे सर, कवडगाव जि ल्हा परिषद शाळेचे बालाजी शिंदे तसेच विविध शाळांती ल शिक्षक उपस्थित होते.
  • उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभे च्छा देत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
  • दिवसभर झालेल्या सामन्यांना शाळेतील शिक्षक व शिक्ष केतर कर्मचारी, मोठ्या संख्येने पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
  • महात्मा गांधी विद्यालयाच्या १४ व १७ वर्षे वयोगटातील दोन्ही संघांनी उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविल्याने विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आण खी एका मानाचा तुरा रोवला गेला आहे.
  • दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्द ल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा री, पालक व क्रीडाप्रेमींनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles