परंडा तालुक्यातील कंडारी येथे श्री काळभैरवनाथ जोगे श्वरी मंदिरात लाखोंची चोरी; तालुक्यात मोठी खळबळ.!

  • प्रतिनिधी : परंडा: फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कंडारी येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान असलेल्या थोरले श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी मंदिरात मध्यरात्री धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
  • या धडकेबाज चोरीमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.
  • नेमकी घटना कशी घडली…?
  • चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करून जोगेश्वरी देवीच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम लांबवली.
  • चोरी गेलेल्या दागिन्यांमध्ये ८० मणी दोन डोरली, कनात ली नथ, फुलाझुब, चांदीचे हार यांसह सुमारे ६ महिन्यांपा सून न उघडलेली दानपेटी असा एकूण अंदाजे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
  • पहाटे ५:०० वाजण्याच्या सुमारास पुजारी मंदिरात आले असता चोरीची ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ताबडतोब ग्रामस्थांना व मंदिराच्या ट्रस्टला याची माहिती दिली.
  • घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घे त पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
  • सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा संशय:
  • या घटनेतील सर्वात संशयास्पद आणि चर्चेचा मुद्दा म्हण जे, मंदिरातील नेहमी सुरू असणारे सीसीटीव्ही कॅमेरे आ दल्या दिवशी दुपारी ४:०० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिव शी पहाटे ६:०० वाजेपर्यंत अचानक बंद का..? होते.
  • नेमक्या याच कालावधीत चोरी झाल्यामुळे “चोरीपूर्वीच सीसीटीव्ही जाणीवपूर्वक बंद केले होते का?” बंध झाले होते असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
  • या प्रकरणाची सखोल चौकशी करून कॅमेरे बंद असण्या मागचे खरे कारण शोधावे आणि लवकरात लवकर चोर ट्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी आक्रम क मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles