वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला; पटकावले सुवर्णपदक…!

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्यातील वडदह सोळ गावचे सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. असलम मुकादम यांचे सुपुत्र अफ्फान मुकादम याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
  • अफ्फान आणि त्याच्या टीमने ‘आशिया रोबोटिक्स स्पर्धे त’ (Asia Robotics Competition) भारताचे प्रतिनि धित्व करत सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर (Gold Medal) आपले नाव कोरले आहे.
  • या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियातील अनेक देशांमधील दिग्गज टीम्स सहभागी झाल्या होत्या.
  • अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक स्पर्धेत अफ्फान आ णि त्याच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या रोबोटिक्स तंत्र ज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
  • त्यांच्या या अफाट कौशल्यामुळे आणि कल्पकतेमुळे पंचां नी त्यांना प्रथम क्रमांकाचा बहुमान देऊन सुवर्णपदकाने सन्मानित केले.
  • वडदहसोळसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि आं तरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचा तिरंगा फडकवणाऱ्या अफ्फानच्या या उत्तुंग यशामुळे संपूर्ण राजापूर तालुक्यातू न व विशेषतः वडदहसोळ गावातून त्याच्यावर अभिनंदना चा वर्षाव होत आहे.
  • एका समाजसेवकाच्या मुलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या आ णि अखंड मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश संपूर्ण कोकणासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरले आहे.
  • अफ्फानच्या या यशाबद्दल त्याचे, त्याच्या टीमचे आणि मु कादम परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून त्याच्या पुढील शैक्षणिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचालीसा ठी ग्रामस्थ व मान्यवरांकडून भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles