शिवसेनेचे रूपेश कदम यांनी जपली सामाजिक बांधिलकी ‘रास गरबा’ साध्या पद्धतीने साजरा करत केली दुष्काळग्रस्तांना मदत. 

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- महाराष्ट्रातील दुष्का ळग्रस्त शेतकरी आणि नागरिकांच्या परिस्थितीची जाणीव ठेवत शिवसेनेचे रूपेश कदम यांनी यंदाचा ‘रास गरबा उ त्सव’ साध्या पद्धतीने साजरा करण्याचा सामाजिक निर्ण य घेतला आहे.
  • उत्सवावर होणारा उर्वरित खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदती साठी देण्याचा संकल्प त्यांनी यावर्षी केला आहे.
  • याच सामाजिक जाणिवेतून रूपेश कदम यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
  • “शिवसेना – रूपेश श्याम कदम “यांच्या माध्यमातून मुंबईतील मालाड पूर्व कुरार परिसरात वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात.
  • रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, वृक्षारोपण आणि पर्याव रण संवर्धन यांसारख्या उपक्रमांतून फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत आहे.
  • तसेच, कुरारची माता राणीचा भव्य देवी उत्सवही फाउंडे शनच्या माध्यमातून आयोजित केला जातो.
  • या फाउंडेशनचा ‘रास गरबा उत्सव’ मुंबईत प्रसिद्ध असून, या उत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक, तरुणाई, से लिब्रिटी तसेच सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रां तील मान्यवर उपस्थित राहतात.
  • यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे महाराष्ट्रातील अनेक भा गांत कोरडा दुष्काळ पडला असून पिकांचे मोठ्या प्रमाणा त नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
  • अशा परिस्थितीत उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा कर ण्याऐवजी त्यावरील खर्च दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्याचा संवेदनशील निर्णय रूपेश कदम यांनी घेतला.
  • आनंद साजरा करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देणे महत्त्वाचे असल्याची सामा जिक जाणीव त्यांच्या या निर्णयातून दिसून येते. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
  • कुरारच्या माता राणीच्या आशीर्वादाने राज्यावरील दुष्का ळाचे संकट लवकर दूर व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदा वी, अशी प्रार्थना रूपेश कदम यांनी यावेळी देवीच्या चरणी केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles