
विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेची पुन्हा मोर्चे बांधणी सुरु.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :- कोकण रेल्वे वरच्या प्रवाशांनी ओसंडून वाहणाऱ्या विलवडे रेल्वे स्थानकाच्या विविध मागण्या घेऊन विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई ग्रामीण या संघटनेकडून २० सप्टेंबर २०२६ रोजी विलवडे रेल्वे स्टेशनजवळ लाक्षणिक उपोषण आयोजित करण्या त आले होते.
- विलवडे रेल्वे स्थानकावरती अवलंबून असलेल्या ७० ते ७२ गावच्या प्रवाशांनी प्रचंड गर्दी केलेल्या या उपोषणाची प्रशासनाकडून दखल घेऊन काही मागण्या मान्य केल्याचे व त्याचबरोबर तशी लेखी आश्वासने पुढील पंधरा दिवसा त देऊ असे सांगून उपोषण मागे घ्यायला लावले होते.

- विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेने सुद्धा जे हाती लागते आहे ते घेऊन सदरचे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
- प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे दिनांक ६ ऑक्टोबर रो जी दिलेल्या पत्रात सध्याच्या फलाटावर पत्रा शेड व आ धुनिक प्रतिक्षालय बांधण्याकरीता निधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
- विलवडे स्थानक ते मुख्य रस्ता या मार्गाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने महाराष्ट्र शासन यांचेकडे प्रस्ताव पाठ विण्यात आला आहे.
- दोन नंबरच्या फलाट बांधण्याकरीता निधीची तूरतद कर ण्याकरीता २०२७-२८ च्या अंदाजपत्रकात प्रस्ताव पाठवि ण्यात आला आहे.
- तसेच दिव्यांग प्रवाशांना फलाटावर येणे सोयीचे व्हावे या साठी रॅम्प बनविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे यां चा उल्लेख असल्याने पुढील कार्यवाही करीता वेळ देण्या चे संघटनेने ठरविले आहे.
- मात्र विलवडे रेल्वे स्थानकावरती जनशताब्दी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस,कोच्युवेली एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्स प्रेस व मांडवी एक्सप्रेस या गाड्या थांबविण्याबाबत प्रशा सन ठोस पाठपुरावा करीत सांगत नाही म्हणूनच या गाड्यांच्या थांब्याबाबत संघटना पाठपुरावा करीत राहणार आहे.
- आज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे स्था यी समिती सदस्य असलेल्या मा.खासदार श्री निलेशजी लंके यांची भेट घेऊन विलवडे रेल्वे स्थानकावर अधिका धिक एक्सप्रेस गाड्या का थांबवल्या पाहिजेत याचे स्पष्टी करण दिले.
- त्याचबरोबर ज्येष्ठ खासदार माननीय शरदचंद्रजी पवार यां ची भेट घेऊन संघटने मार्फत विलवडे रेल्वे स्टेशन बाबत च्या मागण्यांचे निवेदन दिले.
- ना. पवारजीनी तात्काळ त्यावरती शेरा मारून संबंधित मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्याचे आपल्या कार्यालयाला आदेश दिले.
- आज मान्यवरांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्ट मंडळात संघ टनेचे कार्याध्यक्ष- श्री.रमेश काटकर, सरचिटणीस- श्री. रा ज हांदे, सल्लागार – श्री सुभाष लाड, उपाध्यक्ष- श्री दीपक जानस्कर व सदस्य – श्री प्रकाश तोरस्कर हे उपस्थित होते.
- आमच्या मागण्या होईपर्यत ही संघटना सातत्याने मोर्चे बां धणी करीत राहणार असल्याचे कार्याध्यक्ष श्री रमेश काट कर यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






