
विद्याविहार येथील पुलास ‘पद्मश्री नाना पाटेकर सेतू’ नाव द्यावे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- विद्याविहार मधील एम. जी. रोड येथील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलास ‘पद्मश्री नाना पाटेकर सेतू’ असे नाव देण्यात यावे.
- अशी मागणी ईशान्य मुंबई विभाग क्रं.०८ च्या वतीने वि भागप्रमुख श्री.तुकारामजी (सुरेश) कृष्णा पाटील यांनी मुंबईच्या महापौर मा.सौ.रितूताई तावडे, मुंबई महानगरपा लिका आयुक्त मा.श्रीमती अश्विनी भिडे मॅडम आणि ‘एन’ विभाग प्रभाग समिती अध्यक्षा मा. सौ. अश्विनीताई मते यांना निवेदनाद्वारे केली आहे.

- मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टी त आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे, तसेच नाम फा उंडेशनच्या माध्यमातून शेतकरी आणि गरजूंच्या मदतीसा ठी मोलाचे कार्य करणारे महाराष्ट्राचे सुपुत्र पद्मश्री नाना पाटेकर यांच्या नावाने या पुलाचे नामकरण व्हावे, ही आमची ठाम मागणी आहे.
- मराठी माणसाच्या कर्तृत्वाचा गौरव, मराठी अस्मितेचा स न्मान आणि महाराष्ट्राच्या सुपुत्राला योग्य आदरांजली ठरेल हीच या मागणीमागील भावना असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- याप्रसंगी श्री. सुनीलजी मोरे (नगरसेवक, प्रभाग क्र. १२३ व बेस्ट समिती सदस्य) सौ. स्वरूपाताई पाटील (नगरसेवि का, प्रभाग क्र. १२७ व आरोग्य समिती सदस्या), श्री.अजि तजी गुजर (उपविभागप्रमुख) श्री.अजितजी भायजे (उप विभागप्रमुख),श्री.इम्रानजी शेख (विभाग समन्वयक) श्री. अशोकजी वंडेकर (विभाग संघटक), श्री.प्रकाशजी वाणी (विधानसभा कार्यालयप्रमुख), श्री. अजयजी मंडलिक (शाखाप्रमुख) तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






