
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६: बेरोजगारी आणि रखडलेल्या भरतीचा प्रश्न ऐरणीवर; ४१ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता अत्यंत रंजक वळणावर आली असून, यंदाच्या निवडणुकीत ४१ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
- केवळ उमेदवार निवडणे एवढ्यापुरतीच ही निवडणूक मर्यादित नसून, पदवीधरांच्या ज्वलंत प्रश्नांना प्राधान्य देणारे आणि त्यांच्या भविष्याला योग्य दिशा देणारे खंबीर नेतृत्व निवडण्याचे मोठे सामर्थ्य मतदारांच्या हाती आले आहे.
- त्यामुळे “आश्वासनांची पडताळणी करा, हिशेब मागा आणि मगच मतदान करा,” असा सूर सुज्ञ पदवीधर मतदारांमधून उमटत आहे.

- बेरोजगारी आणि रखडलेली भरती मुख्य मुद्दा
- सध्या मराठवाड्यातील पदवीधर तरुणांसमोर बेरोजगारीचे मोठे संकट उभे आहे. शिक्षण पूर्ण करूनही हजारो तरुणांना रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे.
- शासकीय विभागांमधील हजारो रिक्त पदे, रखडलेली नोकरभरती प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांमधील सातत्याने येणारे अडथळे यांमुळे तरुण वर्गात तीव्र चिंता आणि संताप आहे.
- या प्रश्नांवर केवळ पोकळ आश्वासने न देता, शासनदरबारी प्रभावीपणे आणि आक्रमकपणे पाठपुरावा करणारा लोकप्रतिनिधी मिळावा, अशी मतदारांची आग्रही मागणी आहे.
- डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा
- या निवडणुकीत ४१ उमेदवार रिंगणात असले, तरी डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण मतदारसंघाचे विशेष लक्ष लागले आहे.
- रोजगार निर्मिती, रखडलेल्या भरती प्रक्रिया मार्गी लावणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी ते कोणती भूमिका घेतात आणि त्यांच्याकडे या प्रश्नांवर काय ठोस कार्ययोजना (व्हिजन) आहे, याविषयी मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
- पुढील ६ वर्षांच्या कामकाजाची दिशा ठरणार
- हा मतदारसंघ पुढील सहा वर्षांसाठी आपला प्रतिनिधी निवडणार आहे.
- त्यामुळे मतदारांनी केवळ निवडणुकांपुरती आश्वासने देणाऱ्यांना बाजूला सारून उमेदवाराचा पूर्वअनुभव, प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि प्रत्यक्ष कृती करण्याची तयारी तपासून पाहणे गरजेचे आहे.
- प्रत्यक्ष कामाचे सातत्य आणि पदवीधरांच्या हक्कासाठी लढण्याची उमेदवाराची धमक यावरच यंदाचा कौल अव लंबून राहण्याची दाट शक्यता आहे.
- बेरोजगारी, रखडलेली भरती आणि पदवीधरांच्या विविध प्रश्नांवर जो उमेदवार सर्वात प्रभावी आणि ठोस भूमिका मांडेल, त्यालाच पदवीधरांचे सभागृह (विधानपरिषद) गाठण्याची संधी मिळणार,
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






