
APL शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आता मिळणार धान्याचा लाभ; ‘प्राधान्य कुटुंब योजनेत’ समाविष्ट होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना शासना च्या थेट हस्तांतरण (DBT) योजनेअंतर्गत रोख रक्कमेचा लाभ दिला जात आहे.
- मात्र, विविध कारणांमुळे अद्यापही जिल्ह्यातील १४,३९३ शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
- अशा वंचित लाभार्थ्यांना किंवा रोख रक्कमेऐवजी थेट धा न्य घेण्याची इच्छा असलेल्या शेतकऱ्यांना आता ‘प्राधान्य कुटुंब लाभ योजनेत’ (PHH) समाविष्ट होण्याची सुवर्ण संधी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिली.

- याबाबतचे अधिकृत आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
- डीबीटी योजनेची सद्यस्थिती:
- शासनाच्या २८ फेब्रुवारी २०२३ च्या निर्णयानुसार सुरुवा तीला प्रति लाभार्थी १५0/- रुपये आणि त्यानंतर २० जून २०२४ च्या परिपत्रकानुसार एप्रिल २०२४ पासून प्रति म हिना १७0/- रुपये थेट बँक खात्यात (DBT) जमा कर ण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
- धाराशिव जिल्ह्यात एकूण ४४,३९८ पात्र शिधापत्रिकाधा रकांपैकी ३0,00५ शिधापत्रिकाधारकांना जुलै २०२५ प र्यंतचा लाभ वितरित करण्यात आला आहे.
- प्राधान्य कुटुंब लाभ योजनेसाठीचे निकष:
- धान्याचा थेट लाभ मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या कुटुं बांना खालील अटी व निकष पूर्ण करणे बंधनकारक आहे:
- वार्षिक उत्पन्न मर्यादा:
- ग्रामीण भागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ४४,000/- रुपये आणि शहरी भागातील कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ५९,000/- रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर (Income Tax) भरणारा नसावा.
- • कुटुंबाकडे चार चाकी वाहन नसावे.
- • कुटुंबातील कोणीही सदस्य शासकीय नोकरीत नसावा.
- असा करा अर्ज (आवश्यक कागदपत्रे):
- पात्र आणि इच्छुक शिधापत्रिकाधारकांनी संबंधित तहसी लदार कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) जोडणे आवश्यक आहे:
- शिधापत्रिकेची (Ration Card) छायांकित प्रत.
- शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांच्या आधार कार्डाची छायां कित प्रत.
- पात्र शेतकरी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्व रित आपल्या संबंधित तहसीलदारांशी संपर्क साधून अर्ज सादर करावा, जेणेकरून त्यांना धान्याचा नियमित लाभ सुरू करता येईल, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिका री स्वाती शेंडे यांनी केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






