
ताम्हाणे गावात मयुरी आणि प्रशांत कडू या दांपत्याने फुलवली झेंडूची बाग.
- प्रतिनीधी : ताम्हाणे : प्रमोद तरळ :- राजापूर तालुक्या तील मौजे ताम्हाणे गावातील मयुरी आणि प्रशांत कडू या दाम्पत्याने आपल्या घराबाहेरील जवळपास अर्धा एकर जागेत झेंडूचा मळा फुलवला आहे.
- गेल्या वर्षी प्रशांत यांनी प्रायोगिक तत्वावर १०० झेंडूची रोपे आणून लागवड केली होती. झाडांचे योग्य संगोपन केल्यामुळे खूप चांगला प्रतिसाद मिळून उत्तम प्रतीची फुले त्यांना मिळाली.

- या अनुभवातून त्यांनी यंदा सुमारे ३००० झेंडूची रोपे ला वून गतवर्षीच्या प्रयोगाचा पुढचा टप्पा पार केला. याकामी त्यांच्या नवविवाहित पत्नी मयुरी यांनीही थेट शेतात उतरू न सर्व कामात हातभार लावला.
- नांगरणी, फवारणी, मशागत यांसह सर्व गोष्टीत त्यांनी पुढाकार घेतला.
- थोडीफार मेहनत घेतली तर यश नक्की मिळत अशी प्र शांत यांची धारणा आहे. तसेच शेती राखली पाहिजे हे या दाम्पत्याचे ठाम मत आहे.
- या सकारात्मकतेमुळेच ते शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यांच्या शेतामध्ये इंद्रायणी जातीचा तांदूळ बहर ला असून काही दिवसात कापणीला येईल.
- ते रोज सरासरी एक ते दोन तास आपल्या शेतात घालव तात. नुकतीच झेंडूची फुले तोडणीला आलेली आहेत.
- सध्या नवरात्री उत्सवामुळे त्यांच्या फुलांना परिसरात चांग ली मागणी असून फुलांचा चांगला खप होत आहे.
- सध्या बागेत पिवळा आणि केशरी अशा दोन रंगाचे झेंडू उपलब्ध आहेत व किरकोळ व घाऊक विक्री सुरू आहे.
- एका बाजूला कोकणात रोजगार नाही, उत्पन्नाचे साधन नाही असा समज दृढ होत घरे बंद होत असताना या नव विवाहित दांपत्याने शेतीमध्ये टाकलेले पाऊल नक्कीच क्रांतिकारी म्हणावे लागेल.
- तालुक्यात कोणाला दसरा किंवा इतर कार्यासाठी झेंडू फु ले हवी असतील तर ७५१७२०७१२५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






