
महायुतीच्या प्रचारासाठी परंड्यात पदवीधर मेळावा उत्साहात; आमदार विक्रम काळे व माजी आमदार राहुल मोटे यांचे मार्गदर्शन
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मराठवाडा पदवीध र मतदारसंघातील महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित प वार गट, भाजप आणि शिवसेना-एकनाथ शिंदे गट) अधि कृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या प्रचारा र्थ आज महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे पदवीधरांचा मेळावा उत्साहात पार पडला.
- या मेळाव्यात स्टार प्रचारक शिक्षक आमदार विक्रम बप्पा काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी पदवीधरांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

- मेळाव्यामध्ये पदवीधरांच्या सहभागाला महत्त्व देत, महायु तीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या विजयासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करण्याचा निर्धार या प्रसंगी व्यक्त कर ण्यात आला.
- गुणवंत विद्यार्थिनी स्नेहल जगदाळे हिचा गौरव
- या कार्यक्र माचे विशेष आकर्षण म्हणजे महात्मा गांधी प्रशालेची मा जी विद्यार्थिनी स्नेहल गणेश जगदाळे हिचा झालेला विशे ष सत्कार.
- स्नेहल सध्या सी.ओ.ई.पी. गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, पुणे येथे इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षात शिकत असून, ति ला नामांकित ‘कोकाकोला’ कंपनीमध्ये इंटर्नशिप दरम्यान १२ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
- दैदिप्यमान यशाबद्दल आमदार विक्रम काळे, माजी आम दार राहुल मोटे, मुख्याध्यापक बाळासाहेब काशीद, पर्यवे क्षक प्रवीण शेरे आणि स्टेजवरील मान्यवरांच्या हस्ते स्नेह लचा तिच्या पालकांसह गौरव करण्यात आला.
- मान्यवरांची उपस्थिती
- या मेळाव्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अरविंद बप्पा रगडे, धाराशिव जिल्हा कृषी व पशुसंवर्धन सभापती भाऊसाहेब खरसडे काका, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक राहु ल बनसोडे, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्र कांत पवार, महारुद्र बप्पा मोटे महाविद्यालयाचे प्रा. झोंबा डे सर, बावची विद्यालयाचे संस्थापक रोडगे सर व मुख्या ध्यापक नारायण खैरे, आणि कल्याणसागर माध्यमिक वि द्यालयाचे मुख्याध्यापक किरण गरड उपस्थित होते.
- तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुजित देव कते व रवींद्र जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख संदीप पा टील, श्रीहरी नाईकवाडी, प्रा. दयानंद शिंदे, माजी नगराध्य क्ष शहा बर्फीवाले यांच्यासह तालुक्यातील विविध शाळां तील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि बहुसं ख्य पदवीधर या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






