
श्री.क्षेत्र टेरव येथे नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न.
- प्रतिनीधी : चिपळूण : प्रमोद तरळ :- भक्तीमय वाताव रण,ढोल – ताशांचा गजर, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, फुला फळांची आकर्षक सजावट आणि हजारो भाविकांच्या उ पस्थितीत दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथील कुल स्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थानचा नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.
- नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या देव स्थानाला महाराष्ट्र शासनाने यात्रास्थळ व पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा आणि तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा दिला आहे.
- महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यांतील भाविकां नी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

- नवरात्रोत्सवात विधिवत घटस्थापना, अभिषेक, पूजा-अ र्चा, चंडीपाठ, नवचंडी याग, हरिपाठ, संगीत भजन, रासग रबा, जाखडी नृत्य आणि हळदीकुंकू अशा विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले.
- अष्टमीला पारंपरिक विधीनंतर मानकऱ्यांच्या हस्ते प्रती कात्मक बळी देण्यात आला. रात्री ढोल-ताशांच्या गजरात देवीच्या पालखीचा छबिना काढण्यात आला.
- मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, फुलाफळां ची सजावट आणि देवींचा नवरंगी साज भाविकांचे विशेष आकर्षण ठरला.
- सामाजिक बांधिलकी जपत १३ ऑक्टोबर रोजी मंगेश आंब्रे व मिलन आंब्रे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आला.
- वापर टाळणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश देणाऱ्या पिशव्यांचे वितरण करण्यात आले.
- सौ.ज्योती घाग (दहिवली) व श्री. विनायक सुर्वे (कुंभार खाणी) यांनी देवींसमोरील स्टीलचे रेलिंग अर्पण केले. एका भाविकाने चार देवींच्या चरणी सोन्याचे डोळे अर्पण करून नवसपूर्ती केली.
- टेरवचे सुपुत्र चिराग शैलेशराव मोरे यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य रील स्पर्धेत ४५ ते ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
- ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेली मंदिर परिसराची दृश्ये समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने देवस्थानला व्यापक प्रसि द्धी मिळाली.
- स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना दसऱ्याच्या दिवशी सन्मा नचिन्ह, रोख पारितोषिक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
- अन्य सहभागी स्पर्धकांनाही सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
- या तरुणांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजद्वारे आकर्षक रील्स च्या माध्यमातून श्री क्षेत्र टेरव देवस्थानच्या नवरात्रोत्सवा ची प्रसिद्धी देशातील, परदेशातील तब्बल १५ लाख (१५, ००,०००) भाविकांपर्यंत पोहोचवली.
- तसेच उत्सवाला विविध वृत्तपत्रे व ऑनलाइन न्यूज पोर्ट ल्स आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने विशेष प्रसिद्धी दिली.
- लोकप्रतिनिधी, अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी, ग्रामस्थ, मा हेरवाशिणी व पर्यटकांनी देवीचे दर्शन घेतले. दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक पूजनानंतर सोने लुटण्याची प्रथा पार पाडण्यात आली.
- नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे का र्यकर्ते, ग्रामस्थ, दानशूर भक्त, रील स्पर्धक, पत्रकार, वृत्त वाहिनी, प्रशासन, पोलीस, महावितरण आणि सर्व हितचिं तकांचे समस्त ग्रामस्थ,टेरव यांच्या वतीने आभार मानण्या त आले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






