गुरुकृपा हार्ट फाउंडेशन तर्फे आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लॅकेंट वाटप.

  • प्रतिनीधी : विक्रमगड : प्रमोद तरळ :- डॉ.जी.पी. रत्न पारखी यांच्या ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’ च्या डॉ. शशांक शहा,डॉ.स्मृती रत्नपारखी, श्रीमती दीपा श्रॉफ, डॉ.जी. पी. रत्नपारखी (अध्यक्ष, गुरुकृपा हार्ट फाउंडेशन) यांचा समा वेश आलेल्या टीमच्या वतीने पालघर जिल्ह्याच्या विक्रमग ड तालुक्यातील खालील आदिवासी शाळांना सस्नेह भेट दिली:
  • १) जिल्हा परिषद शाळा, काऱ्हे तालावली, ता. विक्रमगड (४३१ विद्यार्थी) २) जिल्हा परिषद शाळा, सावरखिंड, ता. विक्रमगड (२१६ विद्यार्थी) (सुमारे ३ तास २० मिनिटांचा खडतर प्रवास करून) गुरुकृपा फाऊंडेशन च्या सातत्य पूर्ण उपक्रमांतर्गत, शनिवार, दि.२४ ऑक्टोबर २०२६ रो जी आयोजित या कार्यक्रमात जवळपास ६४७ विद्यार्थ्यां ना थंडीपासून बचाव करण्यासाठी सतरंजी व ब्लँकेट वित रण करण्यात आले.
  • ३५० आदिवासी महिलांना दिवाळी भाऊबीज भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले.
  • विक्रमगड परिसरामध्ये हिवाळ्यात तीव्र आणि अतिशय बोचणारी थंडी असते. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना सदर मदत अत्यंत मोला ची ठरेल.
  • डॉ.जी.पी.रत्नपारखी यांच्या ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’च्या सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमांपैकी या उपक्रमातून एकूण १००० गरजूंना प्रत्यक्ष लाभ झाला आहे.
  • याप्रसंगी उपस्थित शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थी व महिलांना वेळेवर मिळालेल्या या योग्य मदतीबद्दल मना पासून आभार मानले आणि उपक्रमाचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles