
‘शेतकऱ्यांनो, कर्जाला घाबरू नका; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका….!माजी मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा शेतकऱ्यांना दिलासा; दुष्काळ निवारण, चारा छावण्या आणि दिवाळी किट वाटपाची घोषणा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यासह परिसरात दुष्काळाचे संकट गडद होत असताना शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी माजी मंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी महत्त्वपूर्ण घोषणा के ल्या आहेत.
- गोरगरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी भूमिहीन शेतकरी व गरीब कुटुंबांना विशेष दिवाळी किट, तसेच प्रत्येक रेश न कार्डधारकाला पाच किलो साखर देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

- त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करत आ र्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
- दि. २९ रोजी भैरुनाथ साखर कारखान्यावर आयोजित कार्यक्रमात उपस्थित शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिकां शी संवाद साधताना डॉ. सावंत बोलत होते.
- दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना करणार
- यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामा न्य जनतेसमोर अनेक संकटे उभी राहिली आहेत.
- पिकांचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता लक्षात घेऊन दु ष्काळातून सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

- शासनाच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक पातळीवर आव श्यक उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये आणि पशु धनाचे नुकसान टाळता यावे, यासाठी परिसरात योग्य आणि सुसज्ज चारा छावण्या उभारण्याबाबतही त्यांनी आश्वासन दिले.
- त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
- ‘फायनान्सवाल्यांचा त्रास असल्यास थेट माझ्याकडे या’
- शेतकऱ्यांच्या वाढत्या आर्थिक अडचणी आणि कर्जवसु लीच्या तगाद्याबाबत चिंता व्यक्त करताना डॉ.सावंत यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.
- ते म्हणाले, “शेतकऱ्यांनो, कोणत्याही बँकेचे किंवा फायना न्स कंपनीचे कर्ज डोक्यावर असेल, तर घाबरून जाऊ न का. कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊ ल अजिबात उचलू नका.

- फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी त्रास दिला जात अ सेल, तर त्याची तक्रार थेट माझ्याकडे आणा. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन; मात्र कर्जापायी कोणत्याही शेतकऱ्याचा जीव जाता कामा नये.”
- त्यांच्या या विधानामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेत कऱ्यांना आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- दिवाळी किट आणि साखर वाटपाची घोषणा
- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी विशेष दिवाळी किट वाटप करण्यात येईल, असे डॉ. सावंत यांनी जाहीर केले.
- भूमिहीन शेतकरी आणि गरीब कुटुंबांना या किटचा लाभ देण्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय प्रत्येक रेशन कार्डधार काला पाच किलो साखरेचे मोफत वाटप करण्याची घोष णाही त्यांनी केली.
- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात कुटुंबां वरील आर्थिक ताण कमी करण्याच्या दृष्टीने या घोषणांना महत्त्व प्राप्त झाले.
- तथापि, या योजनांची अंमलबजावणी, लाभार्थ्यांची निवड आणि वाटपाचे वेळापत्रक याबाबत अधिकृत तपशील समोर येणे अपेक्षित आहे.
- शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सावंत यांचे आवाहन
- दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि वाढत्या आर्थिक अडच णींमुळे शेतकरी वर्ग चिंतेत असताना डॉ.तानाजीराव सावं त यांनी शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटाचा सामना करावा, असे आवाहन केले.

- त्यांच्या घोषणांमुळे परिसरातील शेतकरी आणि गरीब कुटुंबांमध्ये अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.
- या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- आता दुष्काळ निवारण, चारा छावण्या आणि दिवाळी किट वाटपाच्या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






