
दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मागासवर्गीयांना तातडीने आर्थिक मदत द्या: संजय कुमार बनसोडे यांची परंडा तहसीलदारांकडे मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्ह्या सह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्का ळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर व मागा सवर्गीय समाजातील नागरिकांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.
- या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ठवले) चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी परंडाचे तहसीलदार यांना सादर केले.
- धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर बांधव दुष्का ळामुळे प्रचंड आर्थिक संकटात सापडले असून, अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली.

- गंभीर परिस्थितीचा विचार करून केंद्र व राज्य शासनाने तातडीने विशेष आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अ शी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
- निवेदनातील प्रमुख मागण्या:
- दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मागासवर्गीय शेतकरी व शेतमजुरांचे पीककर्ज आणि पात्र कृषी कर्ज पूर्णपणे माफ करावे.
- महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ व इतर महा मंडळांच्या कर्जदारांना कर्जमाफी देऊन पात्र लाभार्थ्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.
- मागासवर्गीय कुटुंबांतील जनावरांसाठी चारा छावण्या सु रू करून चारा उपलब्धता व आवश्यक पशुधन संरक्षणा च्या उपाययोजना कराव्यात.
- प्रत्येक गावातील दलित वस्त्यांमध्ये बोअरवेल पाडून पा णी उपलब्ध करून द्यावे तसेच टँकरद्वारे नियमित पाणी पुरवठा करावा.
- महिला बचत गटांच्या कर्जदारांना कर्जमाफी व आर्थिक दिलासा द्यावा.
- दलित वस्त्यांतील महिलांना खासगी फायनान्स कंपन्यां कडून देण्यात आलेल्या कर्जाची तात्काळ वसुली थांबवावी.
- मागासवर्गीय कुटुंबांना स्वाधार योजनेचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा.
- या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित केंद्रीय मंत्रालय व महाराष्ट्र शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवा वा आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना दिलासा मिळवून द्या वा, अशी विनंती संजय कुमार बनसोडे यांनी केली आहे.
- या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव तसेच परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.तानाजी सावंत यांनाही सादर करण्या त आल्या आहेत.
- निवेदन सादर करताना रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीर दादा सुर वसे, तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, सोशल मीडिया आ यटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे, ज्येष्ठ नेते संजीवन भोसले, बाबा गायक वाड, भारत धेंडे, फुलचंद ओव्हाळ, बापू हावळे, हरिभाऊ आढाळे, भास्कर ओव्हाळ, संजय यशवद, रामा दाभाडे, आजिनाथ कांबळे, हनुमंत हावळे, बापू लोंढे, उत्तम ओहा ळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






