मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या ३ वर्षांच्या सामाजिक कार्याचा आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडून गौरव….! पुणे येथे संघटनेचा वार्षिक अहवाल प्रकाशित; पुढील वाटचालीसाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मुस्लिम एकता सा माजिक संघटना, महाराष्ट्र राज्य या संघटनेला यशस्वीरि त्या तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या त्रैवार्षिक अहवालाचे पुणे येथे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले.
  • राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रा.डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते या वार्षिक अहवा लाचे अधिकृत प्रकाशन करण्यात आले.
  • डॉ.सावंत यांनी संघटनेने गेल्या तीन वर्षांत केलेल्या अष्ट पैलू सामाजिक कार्याचे जाहीर कौतुक करून त्यांच्या भा वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
  • मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली या संघ टनेने अत्यंत अल्प कालावधीत सामाजिक क्षेत्रात आपली एक वेगळी व आदर्श निर्माण केली आहे.
  • समाजातील गोरगरीब,गरजू, वंचित आणि दुर्लक्षित घटकां ना हक्काचा मदतीचा हात देण्याबरोबरच समाजात सामा जिक सलोखा, एकता आणि बंधुभाव वाढविण्यासाठी ही संघटना सातत्याने ग्राउंड लेव्हलवर कार्यरत आहे.
  • गेल्या तीन वर्षांत संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजि क उपक्रम राबवून गरजू कुटुंबांना अन्न-धान्य व आर्थिक मदत करणे, गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देणे, तसेच समाजातील वि विध घटकांना एकत्र आणून सलोखा राखण्याचे मोलाचे कार्य केले गेले आहे.
  • सर्व कल्याणकारी कार्याचा सविस्तर आढावा या वार्षिक अहवालाच्या माध्यमातून जनकांसमोर मांडण्यात आला आहे.
  • अहवाल प्रकाशन सोहळ्यात बोलताना आमदार डॉ. ताना जीराव सावंत साहेब यांनी संघटनेच्या निस्वार्थी सामाजि क वाटचालीची प्रशंसा.
  • तसेच मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेले हे समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही अ धिक व्यापक व प्रभावी स्वरूपात राबविण्यासाठी आप ल्या वतीने सर्वतोपरी सहकार्य व मदत दिली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
  • आमदार डॉ. सावंत साहेबांच्या या खंबीर पाठिंब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मुस्लिम एकता सामाजिक संघटने च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह नि र्माण झाला असून, आगामी काळात अधिक जोमाने व ताकदीने जनसेवेचे कार्य करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
  • “एकता हीच शक्ती, समाजसेवा हाच धर्म आणि जनसेवा हेच ध्येय” या पवित्र विचाराने प्रेरित होऊन मुस्लिम एकता सामाजिक संघटना आगामी काळात महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेणार असल्याचा संकल्प संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
  • तसेच भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांची दि वाळी गोड करण्यासाठी विविध उपाययोजना व मदत जाहीर केल्याबद्दल आसिफ भाई जमादार व संघटनेच्या वतीने आमदार तानाजीराव सावंत साहेबांचे विशेष आभार मानण्यात आले.
  • या महत्त्वपूर्ण अहवाल प्रकाशन सोहळ्याला राजू भाई चाऊस, रशीद शेख, अमीर सय्यद, लतीफ सय्यद, असीम शेख, वसीम चाऊस, फिरोज फकीर, अश्विनीताई साठे, गायकवाड ताई, अक्षय चेडे, संतोष गोरे, अखिलेश जमादा र यांच्यासह संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles