लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण; दोघांविरुद्ध परंडा पोलिसांत गुन्हा दाखल.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- तालुक्यातील कांद लगाव येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आणि फूस लावून पळवून नेल्याची घट ना समोर आली आहे.
  • याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाख ल करण्यात आला आहे.
  • याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हरीदास पांडु रंग पवार (वय ४८, रा. कांदलगाव, ता. परंडा) यांनी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
  • दि. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० ते १.०० वा जेच्या सुमारास जवळा (नि.) शिवारातील शेत गट क्रमांक ४३४ येथून आरोपी ऋत्वीक गोकुळ ढगे (रा. बेलगाव, ता. भूम) याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमि ष दाखवून कायदेशीर पालकत्वाच्या ताब्यातून फूस लावू न पळवून नेले.
  • या कृत्यास दुसरा आरोपी गोकुळ मुरलीधर ढगे (रा.बेलगा व, ता. भूम) याने प्रोत्साहन देऊन मदत केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
  • या तक्रारीवरून दि. १८ नोव्हेंबर रोजी रात्री परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८७, १३७ (२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलीस निरीक्षक चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles