वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.धनंजय सोनटक्के व डॉ.शहाजी चंदनशिवे यांचा पुणे दौरा संपन्न.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-वंचित बहुजन आघा डीचे धाराशिव जिल्हाध्यक्ष प्रा. धनंजय सोनटक्के आणि फुले-शाहू-आंबेडकर विद्वत सभेचे महाराष्ट्र राज्य समन्व यक प्रोफेसर डॉ.शहाजी चंदनशिवे यांचा पुणे दौरा बुधवा र, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
  • सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक संपर्क वाढव ण्याच्या उद्देशाने या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
  • दौऱ्याची सुरुवात सकाळी ११ वाजता लोणी काळभोर येथे झाली. यावेळी आयु. सुनील गोरे यांनी दोन्ही मान्य वरांचे यथोचित स्वागत केले.
  • त्यानंतर दुपारी १.३० वाजता पुणे शहरात वंचित बहुजन आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सवि स्तर चर्चा करण्यात आली.
  • या दौऱ्यात मान्यवरांनी बिबवेवाडी येथे जाऊन ज्येष्ठ पत्र कार विद्यानंद वाघमारे यांची भेट घेतली. नुकत्याच झाले ल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस करण्यात आली.
  • सायंकाळी ७ वाजता मूळचे परंडा तालुक्यातील आणि स ध्या व्यवसायानिमित्त हडपसर येथे वास्तव्यास असलेल्या बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी जिव्हाळ्याचा संवाद साधण्यात आला.
  • दौऱ्याच्या समारोपाप्रसंगी रात्री ९ वाजता लोणी काळभोर येथील आयु.सुनील गोरे यांच्या नूतन निवासस्थानी मान्य वरांनी सदिच्छा भेट दिली.
  • यावेळी आयु. सुनील गोरे व युवा नेते सुशीलकुमार बनसो डे यांच्या हस्ते प्रा.धनंजय सोनटक्के आणि प्रोफेसर डॉ.श हाजी चंदनशिवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
  • या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असू न, परंडा तालुक्यातील पुणेस्थित बांधवांशी असलेले नाते अधिक दृढ झाले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles