
श्री,गणेश (दादा) देऊ बाईंग, ( पुरस्कृत), P. P. L. पंचक्रोशी प्रीमियर लीग २०२५, पर्व २ रे भव्य आयोजन.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-श्री.गणेश (दादा) बाईंग पुरस्कृत P.P.L पंचक्रोशी प्रिमियर लिग रविवार दि. ११ व सोमवार दि. १२ मे २०२५ रोजी ‘क्रिकेट खेळू एक जुटीने’ या आपुलकीच्या शिर्षकाखाली भव्यदिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- या स्पर्धेत भू.तेरवण, खिणगिणी, पेंडखले, कोतापूर या पा च गावातील खेळाडू खेळणार असून या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने एका सोहळ्याचेच आयोजन करण्यात आले आहे.
- रविवार दि. ११ मे ते सोमवार दिनांक १२ मे २०२५ या दोन दिवसात होणारे सामने हे अ-गट, ब-गट, क-गट, ड-गट असे खेळवले जाणार आहेत.
- या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भू – तांबेवाडीचे गावकर श्री शांताराम तांबे यांच्या हस्ते होणार असून गावातील, वा डीतील, तसेच पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मान्यवर या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहणार आहेत.
- तसेच बक्षीस समारंभाला प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्ध व बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, मा.खासदार, लोकप्रि य नेते, श्री.विनायकजी राऊत, तसेच माजी आमदार श्री गणपत कदम साहेब सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
- तसेच विशेष सहकार्य चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख मा श्री.सुरेशजी कदम, धारावी माजी नगरसेवक श्री. वसंतजी नकाशे यांचे लाभले आहे
- विनायकजी राऊत साहेब तसेच गणपत कदम साहेब यां च्या हस्ते विजेत्या संघाला बक्षिस दिले जाणार आहे.
- युवा खेळाडूंना आपल्या खेळाचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल तसेच प्रेक्षकांना डोळ्यांचे पारणे फिटेल असे सामने पाहायला मिळतील आणि या स्पर्धेच्या निमित्ताने युवकांना एकत्र आणून सामाजिक बांधिलकी जपणे हेच प्रमुख उद्दिष्ट आहे असे आयोजक श्री गणेश दादा बांईग यांनी नमूद केले.
- या स्पर्धेचे आयोजन संकेत बाईंग, पद्या बावकर, अजित लाखण, सचिन कुंभार, भास्कर आग्रे, बाळ मांडवकर, ग णेश दुखले, कल्पेश बावकर, नरेश तांबे, प्रमोद मांडवकर, रुपेश बाणे, रुपेश नमसले, शिवा घुमे, योगेश कुंभार, महे श राऊत, भावेश सरफरे, शुभम कुंभार, विनायक निनावे, संदेश कातकर, सूचित बाईंग, विशाल सरफरे, सूर्यकांत बा वकर, नानू बावकर,महेश बावकर, पंकज मांडवकर, प्रवी ण डोंगरकर, महेश भिंगे, साईराज भारती यांनी केले असू न या क्रिकेट स्पर्धेत भाग घेणारे संघ पंचक्रोशी प्रिमियर लिग वर आपले नाव कोरण्यास आतुर झाले असल्याचे नियोजन कमिटीने सांगितले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/