माळशिरस तालुका सकल धनगर समाज यांच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

  • प्रतिनिधी : योगेश सुळे :-माळशिरस तालुका सकल धन गर समाज यांच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे.
  • सन २०१४ बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या ज न- समुदयाला उपोषणकर्तेसह संबोधित करताना मुख्यमं त्री देवेंद्र फडवणीस म्हणाले होते की,माझा धनगर एस.टी. आरक्षणा बाबतीत फार अभ्यास झाला असुन या बाबत माझ्याकडे धनगर एस.टी आरक्षण बाजुने पुष्कळ असे पुरावे आहेत.
  • आता पर्यंतच्या राज्यकर्त्यांनी धनगरांचा फक्त मता पुरता वापर केलेला आहे.
  • तुम्ही आम्हाला या राज्याच्या सत्तेवर बसवा आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धन गर एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करतो.
  • परंतु साहेब आज पर्यंत कॅबिनेटच्या शेकडो मिटींग झा ल्या, शेकडो आदोलन झाले तरी सुध्दा आपण दिलेला शब्द पाळला नाही.
  • म्हणुन आमचे बांधव दिपक बोऱ्हाडे दि. १७/९/२०२५ पा सुन नियोजीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, अंबड चौफुली, जालना येथे उपोषणास बसले आहे.
  • आज त्यांचा उपोषणाचा सातवा वा.दिवस आहे, अजुन पर्यंत आपण या उपोषणाची / आंदोलनाची दखल घेतली नाही.
  • आपण २ दिवसाच्या आत धनगर जमातीच्या घटनादत्त एस.टी.आरक्षणाची अमलबजावणी करुन दिपक बोऱ्हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे अन्यथा दिपक बोऱ्हाडे सांगतील त्या पध्दतीने तसेच धनगरी बाणाने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील.
  • तसेच दिपक बोहऱ्हाडे यांच्या जीवतास काही बरे-वाईट झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील. अ शा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
  • याप्रसंगी नगरसेविका रेश्माताई टेळे, पांडुरंग वाघमोडे, डॉ मारुती पाटील, सोमनाथ वाघमोडे, बाळासाहेब सरगर, शा मराव वाघमोडे, नगरसेवक कैलास वामन, भाऊसाहेब वा घमोडे, सुरेश टेळे, संतोष वाघमोडे,मोहन टेळे,धुळा वाघमो डे, संतोष टेळे दत्ता सावंत संजय पवळ यांच्यासह आदी समाजबांधव उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles