बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी अकोला बाजार येथे साखळी उपोषण; सिद्धार्थ बौद्ध विहार समिती व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन.

  • प्रतिनिधी : सचिन कोयरे : यवतमाळ :- बौद्धगया महा बोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी देशभरात चालविण्यात ये त असलेल्या जनआंदोलनाच्या समर्थनार्थ अकोला बाजा र येथे सोमवार दिनांक १२ मे रोजी मंगलमय बौद्ध पोर्णि मा निमित्त एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले.
  • हे उपोषण सिद्धार्थ बौद्ध विहार समिती अकोला बाजार व समता सैनिक दल शाखा अकोला बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ मार्गावर छत्रपती चौकात(बस स्टँड) येथे पार पडले.
  • अखिल भारतीय बुद्धिस्ट फोरम (AIBF) च्या बॅनरखाली अनेक बौद्ध गट गेल्या एक महिन्याहून अधिक काळ मंदि रात अनिश्चित काळासाठी उपोषण करत आहेत.
  • ज्यांची मागणी आहे की सम्राट अशोकाने २६० ईसापूर्व बांधलेल्या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन केवळ बौद्धांकडे सोपवावे.
  • महाबोधी महावीर संकुल, ज्याच्या बाहेर भिक्षू आणि भि क्षुणी निषेध करत आहेत, तिथे बोधी वृक्ष आहे. ते केवळ एक ऐतिहासिक किंवा धार्मिक स्मारक नाही तर बौद्धां साठी सर्वात आदरणीय स्थळ देखील आहे.
  • बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय.
  • या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे,बौद्ध समाजावर अ न्याय करणाऱ्या बिहार सरकारचा बौद्ध मंदिर कायदा 1949 रद्द करावा.
  • महाबोधी विहाराच्या संपूर्ण व्यवस्थापन व निर्णयाची जबा बदारी बौद्ध समाजाकडे द्यावी. यासाठी विविध बौद्ध संघ टनांकडून आंदोलन केले जात आहे.
  • याचाच एक भाग म्हणुन अकोला बाजार येथे बौद्ध गया विहार मुक्ती आंदोलन यशस्वी पार पडली व ग्रा.पं.अको ला बाजार येथील सरपंच योगेश राजूरकर, उपसरपंच प्र विण मोगरे, सामाजिक कार्यकर्ते राजू मादेश्वर, पत्रकार ह मीद पठाण, सचिन कोयरे, नवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव जाचक, सहसचिव आणि सामाजिक कार्यकर्ते श्राव ण वाघाडे यांनी भेट देत शांततेत सुरू असलेल्या साखळी उपोषणास पाठींबा दिला.
  • या पार्श्वभूमीवर अकोला बाजार येथे आयोजित साखळी उपोषणात बौद्ध अनुयायी, महिलांनी व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
  • या उपोषणातून शासन व प्रशासन यांच्यावर दबाव निर्मा ण करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समा जाच्या स्वाधीन करण्यात यावे.
  • अशी मागणी उपोषणाची सांगता करताना निवेदनातून करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles