
विजेच्या तडाख्याने जांभूळवाड गावात दोन तरुणांचा मृत्यू; समाजसेवक विशाल पडवळ यांच्याकडून आर्थिक मदत..!
- प्रतिनिधी : शहापूर : हिराजी देसले :- जांभूळवाड (ता. शहापूर), दि.18 मे 2025 शहापूर तालुक्यातील अतिदुर्ग म जांभूळवाड गावाजवळ दिनांक 12 मे 2025 रोजी झा लेल्या अचानक ढगफुटीच्या पावसात विजेच्या तडाख्याने दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- प्राप्त माहितीनुसार, साकडबाव-जांभूळवाड परिसरातील उंच पठारावरून बाईकवरून परतत असताना तीन तरुणां वर वीज कोसळली.
- यामध्ये कै. दिनेश नारायण सोगीर व कै.नयन भगवान सो गीर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिसरा तरुण सुदैवाने वाचला असला तरी गंभीर जखमी झाला असून त्याच्या वर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
- घटनास्थळावरच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळता च गावात शोककळा पसरली. मृत युवक अत्यंत शांत, मेह नती व कष्टाळू स्वभावाचे असल्याने त्यांच्यावर संपुर्ण गा वांवर शोककळा पसरली आहे.
- त्यांच्या पश्चात कुटुंबीयांवर प्रचंड दुःखाचे आणि आर्थिक संकट ओढवले आहे.दोघेही शेतकरी मजुरीवर आधारित कुटुंबातून होते..!
- या प्रसंगी शहापूर तालुक्यातील उद्योजक समाजसेवक मा.श्री.विशालजी कोंडीराम पडवळ यांनी सदर कुटुंबियां ना ₹५१,०००/- ची मदत दिनांक 18 मे 2025 (शनिवार) रोजी त्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन सुपूर्त केली.
- या मदतीमुळे मृतक कुटुंबीयांना थोडाफार आधार मिळा ला असून,गावकऱ्यांनी पडवळ साहेबांचे आभार मानले आहेत. या सामाजिक संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
- मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आ त्म्यास शांती लाभो व कुटुंबीयांना या संकटातून सावरण्या ची शक्ती मिळो, हीच सामूहिक प्रार्थना ग्रामस्थांनी केली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/